आर्थिक

Fixed Deposit : 365 दिवसांच्या एफडीवर 9 टक्के व्याज, जाणून घ्या कोणती बँक देतेय कमाईची संधी?

Fixed Deposit : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), HDFC बँक, ICICI बँक यांसारख्या मोठ्या बँकांच्या तुलनेत देशातील अनेक छोट्या वित्त बँका ग्राहकांना ठेवींवर जबरदस्त परतावा ऑफर करत आहेत. या स्मॉल फायनान्स बँका बचत खात्यांवर तसेच मुदत ठेवींवर म्हणजेच FD वर बंपर व्याज देत आहेत.

यामध्ये जन स्मॉल फायनान्स बँक प्रथम क्रमांकावर येते. ही बँक सध्या आपल्या ग्राहकांना FD वर 9 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. यापेक्षा जास्त व्याज कोणतीही बँक ऑफर करत नाही. पण छोट्या वित्त बँकामध्ये ठेवी ठेवणे सुरक्षित आहे का? चला याबद्दल जाणून घेऊया…

अलीकडेच, जन स्मॉल फायनान्स बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केला आहे. हे व्याजदर 2 जानेवारी 2024 पासून लागू आहेत. बदलानंतर, बँक आता ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्तीत जास्त 9.00 टक्के आणि सर्वसामान्यांसाठी 8.50 टक्के एक वर्षाच्या कालावधीत परतावा देत आहे.

सामान्य ग्राहकांसाठी जन स्मॉल फायनान्स बँक एफडी दर

जन स्मॉल फायनान्स बँक आता 7-14 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 3.00 टक्के व्याजदर देत आहे, तर 15-60 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 4.25 टक्के व्याजदर देत आहे. बँक 61-90 दिवसांच्या FD साठी बँक आता 5.00 टक्के व्याज देत आहे आणि 91-180 दिवसांच्या कालावधीसाठी तो 6.50 टक्के आहे. 181-364 दिवसांत परिपक्व होणाऱ्या ठेवींवरील व्याज दर 8.00 टक्के आहे, तर 365 दिवसांत परिपक्व होणाऱ्या ठेवींवरील व्याज दर सध्या 8.50 टक्के आहे.

स्मॉल फायनान्स बँकांमध्ये पैसे ठेवणे सुरक्षित आहे का?

जर तुम्ही बँकेचे ग्राहक असाल, तर तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की जर तुमची बँक डिफॉल्ट झाली किंवा दिवाळखोर झाली तर तुम्हाला बँकेत जमा केलेल्या रकमेवर 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. ही रक्कम तुम्हाला डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणजेच DICGC द्वारे दिली जाते. DICGC ही कंपनी पूर्णपणे रिझर्व्ह बँकेच्या मालकीची आहे. DICGC देशातील बँकांचा विमा उतरवते. देशातील बहुतांश बँका DICGC मध्ये नोंदणीकृत आहेत.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts