Fixed Deposit : सामान्यतः असे दिसून येते की लोक सर्वात सोप्या आणि मोठ्या कमाईसाठी मुदत ठेवी निवडतात. देशातील जवळपास प्रत्येक बँक मुदत ठेव खात्याची सुविधा देते. सध्या मुदत ठेवींवर बंपर व्याज देखील दिले जात आहे. आज आपण अशाच काही बँकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या मुदत ठेवींवर सार्वधिक व्याजदर ऑफर करत आहे.
अलीकडे, वर्ष 2024 च्या सुरुवातीला, अनेक बँकांनी त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर बदलले आहेत. आज आपण बँक ऑफ बडोदा एफडी, कर्नाटक बँकेच्या मुदत ठेवींवरील व्याजदराबाबत बोलणार आहोत, ज्या सध्या सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहेत.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदा एफडीवर भरघोस नफा देत आहे, बँकेने सध्या 300 दिवसांच्या नवीन कालावधीसह एफडी सुरू केली आहे, या योजनेअंतर्गत सामान्य नागरिकांना 7.10 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज मिळत आहे.
यासह, बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 4.45 टक्के ते 7.25 टक्के व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 4.75 टक्के ते 7.75 टक्के व्याज मिळत आहे.
कर्नाटक बँक
कर्नाटक बँक आपल्या ग्राहकांना FDवर बक्कळ नफा मिळवण्याची संधी देत आहे, बँक 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर 3.5 टक्के ते 7.25 टक्के व्याज देत आहे. बँकेने 20 जानेवारीपासून नवीन दर लागू केले असून ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळत आहे.
युनियन बँक
देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेली युनियन बँक ऑफ इंडिया ग्राहकांना श्रीमंत होण्याची संधी देत आहे. व्याजदरांमध्ये अलीकडील बदल करण्यात आला आहे. बँका 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर वेगेवगेळ्या कालावधीसाठी 3.5 टक्के ते 7.25 टक्के व्याजदर देत आहेत. तर त्याच ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के अतिरिक्त ऑफर करत आहे.