Fixed Deposit : सुरक्षित गुंतवणूक म्हणून मुदत ठेव हा पर्याय उत्तम मानला जातो. दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी हा पर्याय लोकप्रिय होत आहे. लोक त्यांचे लग्न, घर बांधणे इत्यादी आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मुदत ठेव (FD) मध्ये गुंतवणूक करतात. तुम्ही निवृत्तीचे नियोजन म्हणून देखील FD मध्ये गुंतवणूक करू शकता. मुदत ठेव सुविधा बँक तसेच पोस्ट ऑफिस कडून पुरवली जाते.
अशातच तुम्हीही मुदत ठेव (FD) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात घेणे फार महत्वाचे आहे. जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त परतावा मिळू शकेल.
एफडीवरील व्याजदर
एफडीवरील व्याजदर हा कालावधीशी जोडलेला असतो. उदारणार्थ, 10 वर्षांच्या कालावधीचा परतावा नेहमी 1 वर्षाच्या कार्यकाळाच्या FD पेक्षा जास्त असेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीसाठी FD निवडू शकता.
रेटिंग
क्रेडिट रेटिंग एजन्सी जसे की CRISIL आणि CARE वित्तीय संस्थांना रेटिंग देण्यासाठी जबाबदार आहेत. ती त्यांना अनेक पॅरामीटर्सवर रेटिंग देते. वित्तीय संस्थेचे क्रिसिल एफएए प्लस किंवा केअर एए रेटिंग सर्वोत्तम मानले जाते.
व्याजदराचे प्रकार
लक्षात घ्या व्याजाचे दोन प्रकार आहे. एक म्हणजे क्युम्युलेटिव्हआणि दुसरे म्हणजे नॉन-क्युम्युलेटिव्ह.
-क्युम्युलेटिव्ह एफडीमध्ये मुद्दल आणि व्याजाची रक्कम जोडून मॅच्युरिटी रक्कम मिळवली जाते.
क्युम्युलेटिव्ह मुदत ठेव हा गुंतवणुकीचा एक प्रकार आहे ज्यामध्ये चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळतं. थोडक्यात, मुद्दलावर आपल्याला जे व्याज मिळतं ते पुन्हा गुंतवलं जातं आणि ठेवीची मुदत संपली कि मूळ रकमेबरोबर व्याजाची रक्कमही ठेवीदाराला परत दिली जाते.
याचा मुख्य फायदा म्हणजे या मुदत ठेवीच्या प्रकारात चक्रवाढ पद्धतीमुळे व्याजावर व्याज मिळतं आणि त्यामुळे मिळणारा परतावा लक्षणीयरित्या वाढत जातो. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांना एखादी रक्कम ठराविक काळासाठी गुंतवायची असेल त्यांना हा पर्याय सोयीचा ठरतो.
-नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीमध्ये तुमची व्याजाची रक्कम मासिक, त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक प्राप्त होईल हे तुम्ही ठरवू शकता.
नॉन क्युम्युलेटिव्ह मुदत ठेव हा गुंतवणुकीचा प्रकार क्युम्युलेटिव्ह मुदत ठेवीच्या अगदी उलट असतो. या प्रकारात सरळ व्याज या पद्धतीने व्याज मिळते. थोडक्यात, या प्रकारात दरमहा, दर तीन महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा अशा प्रकारे मिळत जातं. ज्या ठेवीदारांना नियमित उत्पन्न हवं असतं त्यांच्यासाठी हा प्रकार अतिशय योग्य आहे.
कर्ज सुविधा
अनेक वेळा लोकांना खूप पैशांची गरज भासते, अचानक लागणाऱ्या पैशांची गरज भागवण्यासाठी लोक कर्जासाठी अर्ज करतात. पण, जर तुम्ही एफडी उघडली असेल तर तुम्ही त्यावर कर्ज घेऊ शकता.
गुंतवलेल्या पैशाच्या 75 टक्क्यांपर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकते. तुम्हाला एफडीवरील व्याजापेक्षा २ टक्के जास्त कर्ज द्यावे लागते.
तुलना
सर्व प्रकारच्या एफडी खूप चांगल्या आहेत परंतु वित्तीय संस्था नाहीत, म्हणूनच एफडी खाते उघडण्यापूर्वी, तुम्ही वित्तीय संस्थेच्या मूल्यवर्धित सेवा आणि वैशिष्ट्यांची तुलना केली पाहिजे.