Fixed Deposit : अनेकजण सुरक्षित गुंतवणूक आणि चांगल्या परताव्यासाठी बँकांमधील मुदत ठेवीमध्ये पैशांची गुंतवणूक करत असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसाला कधीही आणि कुठेही पैशांची गरज भासू शकते. त्यामुळे समजा एखाद्याने मुदतपूर्तीपूर्वी एफडीमधून पैसे काढले तर त्याला नियमांनुसार काही दंड भरावा लागतो.
मुदत ठेवींमधून मुदतपूर्व पैसे काढण्यासाठी बँका आकारत असणारा दंड एफडीवर भरण्यात आलेल्या व्याजातून वजा केला जातो. प्रत्येक बँकेच्या दंडाची रक्कम वेगवेगळी असते. तुम्हाला ती गुंतवणूक करण्यापूर्वी माहिती असावी. नाहीतर तुम्ही अडचणीत याल.
हे लक्षात घ्या की ज्यावेळी तुम्ही मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करत असता त्यावेळी तुमची गुंतवणूक काही कालावधीसाठी लॉक करण्यात येते. तुम्ही या कालावधीनुसार तुमची गुंतवणूक करू शकता. तुमचे पैसे मुदतपूर्तीनंतर व्याज परताव्यासह मिळतात. परंतु, त्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही ही एफडी मॅच्युरिटी होण्यापूर्वीच मोडू शकता.
किती होईल दंड?
फिक्स डिपॉझिटमधून वेळेपूर्वी पैसे काढले तर बँका दंड आकारतात. विविध बँकांमध्ये हे दर वेगवेगळे असतात. हे लक्षात घ्या की हा दंड तुमच्या व्याजदरातून वजा करण्यात येतो. तर काही प्रकरणांमध्ये तो एक टक्क्यांपर्यंत असू शकते. बँका तुमच्याकडून सामान्यतः व्याजदराच्या 0.5% ते 1% पर्यंत दंड आकारत असतात. म्हणजेच तुमच्या व्याजाच्या पैशातून दंड घेण्यात येतो.
जाणून घ्या SBI चे शुल्क
SBI च्या नियमांनुसार, समजा तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी FD तोडली तर तुमचे व्याज 1% पर्यंत कापण्यात येते. तसेच त्यावर मिळणाऱ्या व्याजावर दंडही वसूल करण्यात येतो. समजा तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंतची एफडी मिळाली तर मुदतपूर्तीपूर्वी ती एफडी तोडल्याबद्दल 0.50% दंड भरावा लागणार आहे. तर दुसरीकडे, 5 लाखांपेक्षा जास्त आणि एक कोटीपेक्षा कमी एफडीवर मुदतपूर्व ब्रेकसाठी 1% दंड भरावा लागतो.
अशी केली जाते गणना
तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट मुदतीपूर्वी खंडित करत असल्यास प्रभावी व्याजदर ती ज्यावर उघडली गेली होती ती नसेल. बँकिंग भाषेत, त्याला बुक केलेला दर असे म्हटले जाते. हाच दर आहे ज्यावर एफडी खाते चालू केले जाते. त्याऐवजी, पैसे बँकेत राहिलेल्या वेळेसाठी कार्ड दराने व्याज मिळते.