आर्थिक

Fixed Deposit : लवकर करा…! 31 डिसेंबर रोजी बंद होणार सर्वाधिक व्याज देणाऱ्या ‘या’ 5 योजना !

Fixed Deposit : सुरक्षित गुंतवणुक म्हंटले तर सर्वात पहिला पर्याय समोर येतो तो, म्हणजे एफडी. एफडीवरील व्याजदर कमी असले तरी देखील येथील परतावा हा खात्रीशीर मिळतो. अशातच अनेक बँका ग्राहकांना एफडीकडे आकर्षित करण्यासाठी वेळोवेळो विशेष एफडी आणत असतात. पण काही काळाने या एफडी बंद केल्या जातात, ग्राहकांना काही मर्यादेपर्यंतच याचा लाभ घेता येतो.

३१ डिसेंबरपर्यंत अनेक विशेष एफडी योजना बंद होणार आहेत. आज आपण अशा 5 एफडींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची मुदत 31 डिसेंबर रोजी संपत आहे. अशातच तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी शेवटची असेल, चला या विशेष एफडी योजनांबद्दल जाणून घेऊया, ज्या लवकरच बंद होत आहेत.

SBI अमृत कलश 400 दिवस

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, तुम्हाला या योजनेत 400 दिवसांची एफडी मिळू शकते. या अंतर्गत तुम्हाला 7.10 टक्के व्याज मिळेल. तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याज मिळते. तुम्ही या योजनेत केवळ स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत जाऊन गुंतवणूक करू शकत नाही, तर तुम्ही इंटरनेट बँकिंग आणि YONO ॲपद्वारेही यामध्ये गुंतवणूक करू शकता.

अमृत महोत्सव FD 444 दिवस

आयडीबीआय बँकेच्या ४४४ दिवसांच्या अमृत महोत्सव एफडी अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना ७.१५ टक्के व्याज दिले जात आहे. या अंतर्गत एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने विशेष एफडी केल्यास त्याला ७.६५ टक्के व्याज मिळेल.

इंड सुपर 400 दिवस

इंडियन बँकेच्या या विशेष एफडी अंतर्गत तुम्ही 400 दिवसांसाठी गुंतवणूक करू शकता, ज्यावर तुम्हाला प्रचंड व्याज मिळेल. यामध्ये 10 हजार रुपयांपासून ते 2 कोटी रुपयांपर्यंत एफडी करता येते. यामध्ये सर्वसामान्यांना एफडीवर ७.२५ टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ८ टक्के व्याज दिले जात आहे.

इंड सुपर 300 दिवस

या FD अंतर्गत तुम्ही 300 दिवसांसाठी FD करू शकता. यामध्ये तुम्ही किमान 5000 रुपये आणि जास्तीत जास्त 2 कोटी रुपयांची एफडी करू शकता. यामध्ये सर्वसामान्यांना एफडीवर ७.०५ टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ७.५५ टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.८० टक्के व्याज दिले जात आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts