Fixed Deposit : तुम्ही जर सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. कारण सणासुदीच्या काळात काही बँका एफडीवर उत्तम व्याजदर ऑफर करत आहेत. येथे गुंतवणूक करून तुम्ही चांगला पैसा कमावू शकता. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच बँकांची यादी यादी घेऊन आलो आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही मालामाल होऊ शकता.
आम्ही ज्या बँकांबद्दल सांगणार आहोत त्यात काही सरकारी आणि खाजगी बँका आणि एनबीएफसी कंपन्यांचा समावेश आहे. या बँका तुम्हाला एफडीवर ९.५% पर्यंत व्याजदर ऑफर करतात. चला या बँकाबद्दल जाणून घेऊया.
SBI बँक
देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका सर्व ग्राहकांना 3% ते 7.10% पर्यंत व्याज देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 3.5% ते 7.6% दरम्यान असतो.
ICICI बँक
खाजगी क्षेत्रातील बँक ICICI बँक सर्व ग्राहकांना FD वर 3% ते 7.1% दरम्यान व्याजदर देत आहे. 16 ऑक्टोबरपासून लागू होणार्या व्याजदरांमध्ये, ते FD वर ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 7.65% पर्यंत व्याज देत आहे.
HDFC बँक
खाजगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी सर्वसामान्य ग्राहकांना ३ टक्के ते ७.२० टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 3.5% ते 7.75% दरम्यान व्याज मिळत आहे. हे दर 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू आहेत.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
युनिटी स्मॉल फायनान्स बँक सामान्य ग्राहकांना FD वर 4.5% ते 9% दरम्यान व्याजदर देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 4.5% ते 9.5% पर्यंत व्याज मिळत आहे. 1001 दिवसांच्या कालावधीसाठी सर्वाधिक 9% व्याजदर दिला जात आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सात दिवस ते दहा वर्षात परिपक्व होणाऱ्या एफडीवर ४% ते ८.६% पर्यंत व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 4.5% ते 9.1% पर्यंत व्याज मिळत आहे. 2 ते 3 वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज मिळते.
DCB बँक
DCB बँक सामान्य ग्राहकांना FD वर 3.75% ते 7.9% आणि ज्येष्ठ नागरिकांना 4.25% ते 8.50% व्याज देत आहे.
आरबीएल बँक
RBL बँक सामान्य ग्राहकांना मुदत ठेवींवर 3.50% ते 7.80% पर्यंत व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 4% ते 8.30% पर्यंत व्याज मिळते.
पंजाब आणि सिंध बँक
ही बँक FD वर सामान्य ग्राहकांना 2.8% ते 7.40% पर्यंत व्याज देत आहे.
IDFC बँक
IDFC फर्स्ट बँक सामान्य ग्राहकांना 3.50% ते 7.75% पर्यंत व्याज देते. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 4 ते 8.25 टक्के व्याज मिळत आहे. ५४९ दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज दिले जात आहे. बँक त्यावर ७.७५ टक्के व्याज देत आहे.