Fixed Deposit : सध्या मुदत ठेवींवरील व्याजदर खूपच आकर्षक आहेत. म्हणूनच बरेच गुंतवणूकदार येथे गुंतवणूक करण्यात रस दाखवत आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची देखील शक्यता आहे. अशा परिस्थितीत दीर्घ मुदतीसाठी एफडी करणाऱ्या गुंतवणूकदारांनी कोणती पावले उचलावीत असा प्रश्न पडतो.
अशा परिस्थितीत मिड-टर्म एफडी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरते, कारण यामध्ये पैसे जास्त काळ लॉक होत आणि आणि व्याजही चांगला मिळतो. आज आपण अशा 5 बँकांच्या दरांबद्दल जाणून घेणार आहोत जे 2-3 वर्षांच्या मिड टर्म एफडीवर प्रचंड व्याज देत आहेत.
ICICI बँक
जर तुम्हाला ICICI बँकेत FD करायची असेल, तर इथे तुम्हाला मध्यम मुदतीच्या FD वर 3% ते 7.10% पर्यंत व्याज मिळू शकते. हे व्याज दोन कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर उपलब्ध आहे. बँकेने दिलेले 7.10 टक्के व्याज 15 महिने ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर दिले जात आहे. या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याज दिले जात आहे.
SBI बँक
स्टेट बँक ऑफ इंडिया वेगवेगळ्या कालावधीच्या FD साठी 3-7 टक्के व्याज देते. हे दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर दिले जातात. 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर बँकेकडून सर्वाधिक 7 टक्के व्याजदर दिला जातो. तर अमृत कलश डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला ७.१० टक्के व्याज मिळू शकते.
HDFC बँक
HDFC बँक वेगवेगळ्या कालावधीच्या FD साठी 3% ते 7.20% पर्यंत व्याज देत आहे. हे व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीसाठी देखील आहेत. बँक 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी FD वर 7.15 टक्के व्याज देत आहे. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला ७.६५ टक्के व्याज मिळू शकते.
कॅनरा बँक
कॅनरा बँक 2 रुपये कोटींपेक्षा कमी FD वर मध्यम मुदतीसाठी 4% ते 7.25% व्याज देत आहे. बँकेकडून सर्वाधिक 7.25 टक्के व्याज दिले जात आहे, जे 444 दिवसांच्या FD वर दिले जात आहे. तुम्हाला तुमच्यासाठी योग्य वाटेल त्या बँकेत तुम्ही FD करू शकता.
PNB बँक
पंजाब नॅशनल बँक मध्यम मुदतीच्या एफडीवर 3.50 टक्के ते 7.25 टक्के व्याज देत आहे. हे व्याज 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर दिले जात आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून ४४४ दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक ७.२५ टक्के व्याज दिले जात आहे.