आर्थिक

Fixed Deposit : भरघोस नफा कमावण्याची संधी ! ‘या’ बँकेत करा एफडी…

Fixed Deposit :  सुरक्षित गुंतवणूक म्हंटले तर पहिले नाव समोर येते ते म्हणजे मुदत ठेव. येथे तुम्हाला खात्रीशीर परतावा मिळतो. अशातच तुम्हीही सध्या FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी खासगी क्षेत्रातील DCB बँकेने आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात 10 बेस पॉइंट्स (bps) पर्यंत वाढ केली आहे.

DCB बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन एफडी दर 13 डिसेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर, DCB बँक सर्वसामान्य ग्राहकांसाठी सर्वाधिक 8 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.60 टक्के एफडी व्याज दर देत आहे.

DCB बँकचे एफडी दर-

7 दिवस ते 45 दिवसांच्या कालावधीसह FD वर 3.75 टक्के व्याज

46 दिवस ते 90 दिवसांच्या कालावधीसह FD वर 4.00 टक्के व्याज

91 दिवस ते 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD कालावधीवर 4.75 टक्के व्याज

6 महिने ते 10 महिन्यांच्या कालावधीच्या FD वर 6.25 टक्के व्याज

10 महिने ते 12 महिन्यांच्या कालावधीच्या FD वर 7.25 टक्के व्याज

12 महिने, 1 दिवस ते 12 महिने आणि 10 दिवसांच्या FD वर 7.85 टक्के व्याज

12 महिने 11 दिवस ते 18 महिने 5 दिवसांच्या FD वर 7.15 टक्के व्याज

18 महिने, सहा दिवस ते 700 दिवसांच्या FD वर 7.55 टक्के व्याज

700 दिवस ते 25 महिने कालावधीच्या FD वर 7.55 टक्के व्याज

25 महिन्यांच्या कालावधीसह FD वर 8 टक्के व्याज

26 महिने ते 37 महिने कालावधीच्या FD वर 7.60 टक्के व्याज

37 महिन्यांच्या कालावधीसह FD वर 7.90 टक्के व्याज

37 महिने ते 61 महिन्यांच्या कालावधीच्या FD वर 7.40 टक्के व्याज

61 महिन्यांच्या कालावधीसह FD वर 7.65 टक्के व्याज

61 महिने ते 120 महिन्यांच्या कालावधीच्या FD वर 7.25 टक्के व्याज

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts