आर्थिक

Fixed Deposit: 3 वर्षासाठी एफडी करायची का? पोस्ट ऑफिसमध्ये राहील फायद्याची का स्टेट बँकेत? कुठे मिळेल जास्त व्याज?

Fixed Deposit:- आपण जो काही पैसा नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून कष्टाने कमवतो त्या पैशांची बचत आणि गुंतवणूक खूप महत्त्वाची असते. भविष्यकालीन आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पैशांची गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते. गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

बरेच व्यक्ती सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. त्यासोबतच रियल इस्टेट, म्युच्युअल फंड एसआयपी, शेअर मार्केट इत्यादी अनेक पर्यायांचा वापर केला जातो. परंतु यामध्ये गुंतवणुकीची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अनेक गुंतवणूकदार हे फिक्स डिपॉझिट अर्थात मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात.

कारण गुंतवणूक ही सुरक्षित राहणे गरजेचे असतेच परंतु त्या गुंतवणुकीतून मिळणारे व्याज किंवा परताव्याच्या दृष्टिकोनातून देखील गुंतवणूक करताना विचार केला जातो. आता फिक्स डिपॉझिटचा विचार केला तर अनेक बँकांमध्ये एफडी केली जाते किंवा पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटच्या मार्फत देखील एफडी केली जाते.

परंतु यात दोनही पर्यायांचा विचार केला तर यामध्ये तुम्हाला तीन वर्षे गुंतवणूक केल्यास कुठे जास्त व्याज मिळेल? हे देखील माहिती असणे तितकेच गरजेचे असते. याचा अनुषंगाने याबद्दलची माहिती या लेखात घेणार आहोत.

 पोस्ट ऑफिस किंवा स्टेट बँकेत कुठे मिळेल जास्त फायदा?

1- एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचा विचार केला तर ही बँक सामान्य ग्राहकांना दोन ते तीन वर्षाच्या मुदत ठेव योजनेवर सात टक्के व्याजदर देत असून दोन ते तीन वर्षाच्या कालावधी करिता एसबीआय कडून ज्येष्ठ नागरिकांना 7.50% व्याजदर दिला जात आहे.

तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही विशेष मुदत ठेव योजना देखील आहेत. यामध्ये जर आपण बँकेच्या अमृत कलश योजनेचा विचार केला तर या योजनेच्या माध्यमातून सामान्य ग्राहकांना चारशे दिवसांच्या मुदत ठेवीवर 7.10% व्याजदराचा फायदा दिला जातो  व या अमृत कलश योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 7.60% व्याजदर दिला जात आहे.

2- पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना जर आपण पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेचा विचार केला तर या माध्यमातून ग्राहकांना एक वर्षाच्या कालावधी करिता 6.90% व्याजदर दिला जात आहेत तर  या योजनेअंतर्गत दोन वर्षासाठी एफडी करायचे असेल तर सात टक्के आणि तीन वर्षाच्या एफडीवर देखील सात टक्के व्याजदराचा लाभ दिला जात आहे.

अशा पद्धतीने जर आपण स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून दोन वर्षाच्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजदराचा विचार केला तर तो समान व्याजदर उपलब्ध आहे. परंतु तुलनेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अमृत कलश योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 7.10% जास्त व्याजदराचा लाभ देण्यात येत आहे व ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत पाहिले तर स्टेट बँकेमध्ये जास्तीचे 0.50% पोस्ट ऑफिसपेक्षा जास्त व्याज मिळत आहे.

यावरून तुम्ही कोणत्या ठिकाणी तुम्हाला एफडी करणे फायद्याचे ठरेल हे ठरवू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts