आर्थिक

Fixed Deposit : SBI, HDFC की PNB कुठे एफडी करणे अधिक फायदेशीर?, जाणून घ्या…

Fixed Deposit : फिक्स्ड डिपॉझिट हे गुंतवणुकीच्या सर्वात सुरक्षित आणि प्राधान्य साधनांपैकी एक मानले गेले आहे. एफडी करण्याची सुविधा प्रत्येक बँक देते. एफडीचे व्याजदर हे बँकांनुसार ठरवले जातात. अशातच गेल्या वर्षी मे महिन्यापासून रेपो दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर जवळपास सर्व प्रकारच्या बँकांनी त्यांच्या ग्राहकांसाठी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली होती.

अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमचे पैसे सध्या FD स्कीममध्ये गुंतवण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही चांगली वेळ आहे. पण त्याआधी तुमच्यासाठी वेगवेगळ्या बँकांमध्ये एफडीवर काय व्याजदर उपलब्ध आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. जेणे करून तुम्ही तुमच्या गुंतवलेल्या पैशांवर अतिरिक्त लाभ मिळवू शकाल.

आज आम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC बँक आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) द्वारे ऑफर केलेल्या मुदत ठेव व्याज दरांची माहिती देणार आहोत, आम्ही या तीन बँकांच्या एफडी व्यजदराची तुलना केली आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या सोयीनुसार या बँकांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करू शकाल.

एचडीएफसी बँक

HDFC बँक, खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक, आपल्या ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD योजनेचा लाभ देते. या कालावधीत ही बँक आपल्या ग्राहकांना अतिशय चांगल्या व्याजदराचा लाभही देते. तर ज्येष्ठ नागरिक श्रेणीतील ग्राहकांना जास्त व्याजाचा लाभ मिळतो. सामान्य ग्राहकांना किमान 3 टक्के आणि कमाल 7 टक्के व्याजाचा लाभ दिला जातो, तर ज्येष्ठ नागरिकांना किमान 3.50 टक्के आणि कमाल 7.75 टक्के व्याजाचा लाभ दिला जातो. हा व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी आहे.

पंजाब नॅशनल बँक (PNB)

पंजाब नॅशनल बँक (PNB) आपल्या ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD योजना ऑफर करते. या कालावधीत ही बँक आपल्या ग्राहकांना अतिशय चांगल्या व्याजदराचा लाभही देते. तर ज्येष्ठ नागरिक श्रेणीतील ग्राहकांना जास्त व्याजाचा लाभ मिळतो. जेथे सामान्य ग्राहकांना किमान ३.५० टक्के आणि कमाल ७.२५ टक्के व्याजाचा लाभ मिळतो. तर ज्येष्ठ नागरिकांना किमान ४ टक्के आणि कमाल ७.७५ टक्के व्याजाचा लाभ दिला जातो. लक्षात घ्या हा व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD योजना ऑफर करते. या कालावधीत ही बँक आपल्या ग्राहकांना अतिशय चांगल्या व्याजदराचा लाभही देते. तर ज्येष्ठ नागरिक श्रेणीतील ग्राहकांना जास्त व्याजाचा लाभ मिळतो. जेथे सामान्य ग्राहकांना किमान 3 टक्के आणि कमाल 7.50 टक्के व्याजाचा लाभ मिळतो. तर ज्येष्ठ नागरिकांना किमान ३.५० टक्के आणि कमाल ७.५० टक्के व्याजाचा लाभ दिला जातो. हा व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी आहे.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts