आर्थिक

Fixed Deposit : एका वर्षाच्या एफडीवर ‘या’ बँका देत आहेत सर्वाधिक व्याजदर, बघा…

Fixed Deposit : आताच्या काळात अनेकजण चांगल्या भविष्यासाठी स्वतःजवळ असलेले पैसे कुठे ना कुठेतरी गुंतवत आहेत. पण बऱ्याच जणांना सुरक्षित गुंतवणूक कुठे करायची माहित नसते. तसेच गुंतवणुकीवर कोणती बँक जास्त परतावा देईल हे देखील माहिती नसते.

गेल्या वर्षी मे 2023 मध्ये, देशातील सर्वात मोठी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने रेपो दर वाढवण्यास सुरुवात केली. तेव्हापासून बँकांनी जारी एफडीवरील व्याजदरात झपाट्याने वाढ सुरु केली.

FD व्याजदर गेल्या दोन वर्षात सर्वाधिक वाढले आहेत. एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना कमी व्याजदरात पैसे जमा करावे लागत होते पण आता बँक ग्राहकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

त्याच वेळी, एफडीच्या काही कालावधीवर, बँका 9 टक्क्यांहून अधिक देत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या एका वर्षाच्या एफडीवर ७ ते ८ टक्के आणि त्याहून अधिक व्याज देत आहेत. या बँकांमध्ये सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही बँकांचा समावेश आहे.

या बँका देत आहेत सार्वधिक व्याजदर

-उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक एका वर्षाच्या FD वर 8.250 टक्के दराने व्याज देत आहे, जो कोणत्याही बँकेने दिलेला सर्वोच्च व्याज दर आहे.

-Equitas Small Finance Bank एका वर्षाच्या FD वर ८.२ टक्के दराने व्याज देत आहे. बँका वृद्धांना जास्त व्याज देत आहेत.

-यानंतर उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आणि जन स्मॉल फायनान्स बँक देखील ग्राहकांना वार्षिक ८ टक्के व्याज देत आहेत.हे व्याज एका वर्षाच्या कालावधीसाठी दिले जात आहे.

-फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक सात वर्षांच्या एफडीवर ७.६५ टक्के दराने व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी एफडी केल्यास त्यांना अधिक व्याज दिले जाईल.

-इंडसइंड बँक आणि कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक देखील ग्राहकांना 7.5 टक्के व्याज देत आहेत. ही ऑफर दोन्ही बँकांकडून 1 वर्षाच्या व्याजदराने दिली जात आहे.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts