Fixed Deposit : सध्या तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल. आणि गुंतवणुकीसाठी सुरक्षित योजना शोधत असाल तर मुदत ठेव तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. देशातील प्रत्येक बँक मुदत ठेव करण्याची सुविधा देते तसेच तुम्ही पोस्टात देखील मुदत ठेव करू शकता. मुदत ठेव सुरक्षित असल्यासोबतच येथे परतावा देखील चांगला मिळत आहे.
गुंतवणूक सुरू करण्यासाठी दिवाळीचे दिवस अतिशय शुभ मानले जातात. अशा परिस्थितीत जर तुम्ही पैसे वाचवण्याचा विचार करत असाल तर FD हा एक चांगला पर्याय आहे. दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर काही बँकांनी त्यांच्या ग्राहकांसाठी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. अशातच तुम्ही सुरक्षिततेसह तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा कमावू शकता. आज आम्ही अशाच दोन बँका सांगणार आहोत जिथे गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा कमावू शकता.
SBI बँक FD –
-बँक ७ दिवस ते ४५ दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना ३.०० टक्के तर जेष्ठ नागरिकंना ३.५० टक्के व्याज देत आहे.
-बँक 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य नागरिकांना 6.80 टक्के तर जेष्ठ नागरिकंना 7.30 टक्के व्याज देत आहे.
-3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य नागरिकांना 6.50 टक्के तर जेष्ठ नागरिकंना 7.00 टक्के व्याज देत आहे.
-बँक 5 वर्षे ते 10 वर्षांसाठी सामान्य नागरिकांना 6.50 टक्के तर जेष्ठ नागरिकंना 7.50 टक्के व्याज देत आहे.
-400 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना (अमृत कलश योजना) 7.10 टक्के तर जेष्ठ नागरिकंना 7.60 टक्के व्याज देत आहे.
एचडीएफसीची एफडी –
-बँक 30 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 3.50 टक्के तर जेष्ठ नागरिकंना 4.00 टक्के व्याज देत आहे.
-1 वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य नागरिकांना 6.60 टक्के तर जेष्ठ नागरिकंना 7.10 टक्के व्याज देत आहे.
-3 वर्षे 1 दिवस ते 4 वर्षांपेक्षा कमी 7 महिने सामान्य नागरिकांना 7.00 टक्के तर जेष्ठ नागरिकंना 7.50 टक्के व्याज देत आहे.
-4 वर्षे 7 महिने ते 55 महिने सामान्य नागरिकांना 7.20 टक्के तर जेष्ठ नागरिकंना 7.70 टक्के व्याज देत आहे.
-बँक 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षांसाठी सामान्य नागरिकांना 7.00 टक्के तर जेष्ठ नागरिकंना 7.75 टक्के व्याज देत आहे.