Fixed Deposit : एफडीमधील गुंतवणूक सध्या सर्वाधिक लोकप्रिय आहे. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. तसेच गेल्या काही काळापासून एफडीवर उत्तम परतावा देखील ऑफर केला जात आहे. गेल्या एक वर्षापासून सातत्याने एफीड दरामध्ये बदल होत आहे. अनेक बँका एफीवरील व्याजदरात वाढ करत आहेत.
अशातच तुम्ही देखील एफडीमध्ये गुंतवणूक करून मजबूत परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर बँकेने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने (युनिटी बँक) 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. युनिटी स्मॉल फायनान्स बँक आता ज्येष्ठ नागरिकांना 1001 दिवसांच्या मुदत ठेवींवर 9.50% व्याज देईल. त्याच वेळी, सामान्य ग्राहकांना 1001 दिवसांच्या FD वर 9% व्याज मिळेल.
या मुदत ठेवींवर मिळत आहे 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर
युनिटी स्मॉल फायनान्स बँक (युनिटी बँक) 181-201 दिवस आणि 501 दिवसांच्या मुदत ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना 9.25% आणि सामान्य ग्राहकांना 8.75% व्याज देत आहे. स्मॉल फायनान्स बँक 5 वर्षे ते 10 वर्षांच्या मुदत ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना 7.50% आणि सामान्य ग्राहकांना 7% व्याज देत आहे.
युनिटी स्मॉल फायनान्स बँकेचे मुदत ठेव दर
बँक आता 7-14 दिवसांच्या मुदत ठेवींवर 4.50% व्याज देत आहे. त्याच वेळी, युनिटी स्मॉल फायनान्स बँक 15 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 4.75% व्याज देत आहे. युनिटी बँक 46 दिवस ते 60 दिवसांच्या मुदत ठेवींवर 5.25 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, ते 61 दिवस ते 90 दिवसांच्या मुदत ठेवींवर 5.50% व्याज देत आहे.
वेगवेगळ्या कालावधीसाठी बँक व्याजदर
युनिटी स्मॉल फायनान्स बँक 91 दिवस ते 180 दिवसांच्या मुदत ठेवींवर 5.75 टक्के व्याजदर देत आहे. तर बँक 181 दिवस ते 201 दिवसांच्या मुदत ठेवींवर 8.75 टक्के व्याज देईल. बँक 202 दिवसांपासून ते 364 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 6.75 टक्के व्याज देत आहे. युनिटी स्मॉल फायनान्स बँक ३६५ दिवस ते ५०० दिवसांच्या एफडीवर ७.३५ टक्के व्याज देईल. बँक 1002 दिवसांपासून ते 5 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर 7.65% व्याज देते.