आर्थिक

Fixed Deposits : ग्राहक होणार मालामाल..! या सरकारी बँकेकडून 12 महिन्यांच्या FD वर दिले जात आहे सर्वात जास्त व्याज, मिळणार ‘इतका’ परतावा

Fixed Deposits : जवळपास सर्वांचे बँकेत खाते असते. जर तुमचेही बँकेत खाते असेल तर तुम्हीही चांगले पैसे कमावू शकता. आता बँक ऑफ इंडिया ही सरकारी बँक 12 महिन्यांच्या FD वर सर्वात जास्त व्याज दिले जात आहे. त्यामुळे तुमच्याकडे पूर्वीपेक्षा जास्त पैसे कमावण्याची सुवर्णसंधी आहे.

त्यामुळे जर तुम्ही 10 वर्षे गुंतवणूक केली तर तुम्हाला 10 वर्षात चांगला परतावा मिळेल. कालपासून नवीन व्याजदर लागू केले आहेत. याबाबत बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. जाणून घ्या सविस्तर.

जाणून घ्या 7 ते 45 दिवसांच्या ठेवींवरील व्याजदर

बँकेकडून पुढील 7 ते 45 दिवसांत मुदतपूर्ती होणाऱ्या ठेवींवर तीन टक्के दराने व्याज दिले जात आहे. तसेच बँक पुढील 46 ते 46 ते 179 दिवसांत मुदतपूर्ती होणाऱ्या ठेवींवर 4.50 टक्के दराने व्याज दिले जात आहे. बँक ऑफ इंडिया 180 दिवस ते 269 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 5.00 टक्के दराने व्याज देत असून बँक 270 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या FD वर 5.50 टक्के व्याजदर दिले जात आहे.

सर्वाधिक व्याज

बँक ऑफ इंडियाकडून एका वर्षात मुदत ठेवींवर सर्वात जास्त व्याज देण्यात येत आहे. या कालावधीतील एफडीवर सात टक्के दराने व्याज दिले जाणार आहे. तर बँक एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आणि दोन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 6.00 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे.

दोन वर्षे ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 6.75 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. त्याशिवाय तीन वर्षे ते पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 6.50 टक्के व्याजदर दिला जात आहे. सध्या बँक 5 ते 10 वर्षांच्या ठेवींवर 6.00 टक्के व्याजदर मिळत आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज

बँकेच्या म्हणण्यानुसार, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या किरकोळ मुदत ठेवींवर (रु. 2 कोटींपेक्षा कमी) विद्यमान 50 bps व्यतिरिक्त 25 bps अतिरिक्त व्याज मिळत आहे. हा व्याजदर तीन वर्षे आणि त्यावरील सर्व कालावधीसाठी उपलब्ध असणार आहे. अशातच आता बँकेकडून आपल्या ज्येष्ठ ग्राहकांना तीन वर्षांच्या TD साठी 75 बेस पॉईंट्सचा अतिरिक्त व्याजदर ऑफर केला जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts