Flipkart Personal Loan:- जीवनामध्ये पैसा प्रत्येकाला लागतच असतो. जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हापासून आपला रुटीन चालू झाल्यानंतर आपल्याला पैशांची गरज वेगवेगळ्या कामांसाठी भासते. याकरिता प्रत्येक व्यक्ती व्यवसाय किंवा नोकरी करून पैसे कमवत असतो.
परंतु या पैशांची भविष्याच्या दृष्टिकोनातून बचत करणे देखील तितकच गरजेचे असते. परंतु कधी कधी भविष्य काळामध्ये अचानक काही परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्याला जास्त पैशांची आवश्यकता भासते. तसेच एखादे घरातील सदस्य किंवा स्वतःच्या आरोग्याविषयी काही समस्या निर्माण झाल्याने आपत्कालीन परिस्थितीमध्ये ताबडतोब पैशांची गरज भासते. त्यामुळे आपल्याकडे अशावेळी पैसा उपलब्ध असतो असे नाही.
त्यामुळे साहजिकच बँकांच्या माध्यमातून आपण पर्सनल लोन घेण्याचा पर्याय निवडतो. परंतु जर ताबडतोब तुम्हाला पैसा हवा असेल तर मात्र बँकांच्या माध्यमातून तो वेळेवर मिळेल याची खात्री नसतं. कारण कुठलीही कर्ज मंजूर करण्याअगोदर बँकेच्या एका विशिष्ट प्रक्रियेमध्ये जाणे गरजेचे असते.
अशावेळी तुम्हाला कमीत कमी प्रक्रियेतून जात अगदी मिनिटांमध्ये पैसे मिळाले तर अशा परिस्थितीत खूप दिलासा मिळतो. हो तुमची ही गरज फ्लिपकार्ट पूर्ण करू शकते. फ्लिपकार्ट आपल्यापैकी सगळ्यांना माहिती असलेले एक प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी किंवा प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाते.
हे भारतातील प्रसिद्ध असे शॉपिंग वेबसाईट आणि एप्लीकेशन असून फ्लिपकार्ट च्या माध्यमातून अनेक सुविधा दिल्या जातात. फ्लिपकार्ट वरून फ्लाईटची तिकीट बुक करू शकतात किंवा किराणा माल देखील मिळवू शकतात. याकरिता तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात जावे लागत नाही. यासोबतच आता फ्लिपकार्ट ने एक नवीन उपक्रम राबवला असून ॲक्सिस बँकेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जात आहे. फ्लिपकार्ट आता ॲक्सिस बँकेच्या सहकार्याने लोकांना कर्ज देण्यासाठी देखील काम करत आहे.
फ्लिपकार्ट पर्सनल लोन
फ्लिपकार्टने आता ॲक्सिस बँकेसोबत करार केला असून फ्लिपकार्ट वर आता वैयक्तिक कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. या माध्यमातून तुम्हाला पर्सनल लोन अतिशय सहज आणि कमी वेळेमध्ये उपलब्ध होते. या माध्यमातून तुम्ही फ्लिपकार्ट वरून काही मिनिटात वैयक्तिक कर्ज घेऊ शकता आणि तुमची पैशांची गरज पूर्ण करू शकता.
त्यानंतर तुम्ही घेतलेली कर्जाची रक्कम फ्लिपकार्ट आणि ॲक्सिस बँकेला परत करू शकतात. तुम्हाला जर flipkart वरून कर्ज घ्यायचे असेल तर त्याकरिता फ्लिपकार्ट मोबाईल ॲप वर तुम्हाला जावे लागेल आणि तुमच्या प्रोफाईल आयकॉन वर क्लिक करावे लागेल किंवा मेनू आयकॉनवर क्लिक करने गरजेचे राहील.
या ठिकाणी तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळू शकते. त्या ठिकाणी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड, जन्मतारीख इत्यादी काही आवश्यक माहिती नमूद करावी लागेल. महत्त्वाचे म्हणजे तुमचे सगळे माहिती या ठिकाणी सुरक्षित राहील.कारण फ्लिपकार्ट तुमच्या सुरक्षिततेची हमी देते. हे कर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून देखील घेऊ शकता. तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी किंवा कोणत्याही कामासाठी फ्लिपकार्ट वर कर्ज घेऊ शकतात व ती कर्जाची परतफेड करून तुमचा सिबिल स्कोर देखील मजबूत बनवू शकतात.
30 सेकंदात कर्ज मिळणार
फ्लिपकार्ट आणि ॲक्सिस बँक यांच्या भागीदारी अंतर्गत ग्राहकांना 30 सेकंदात कर्ज मंजुरी मिळू शकते. विशेष म्हणजे या कर्जाची परतफेड करण्यासाठी ग्राहकांना परतफेड सायकलची सुविधा देखील मिळते. म्हणजेच तुम्ही सहा महिने ते 36 महिन्याच्या कालावधी त्या कर्जाची परतफेड करू शकतात. फ्लिपकार्टने जवळजवळ आपल्या 45 कोटी ग्राहकांना वैयक्तिक कर्ज द्यायला सुरुवात केली आहे.
कर्ज मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
फ्लिपकार्टच्या माध्यमातून कर्ज मिळवण्याकरिता ग्राहकांना मूलभूत तपशील जसे की पॅन क्रमांक, जन्मतारीख आणि कामाचा तपशील इत्यादी द्यावे लागते. हा सगळा महत्वाचा तपशील दिल्यानंतर ॲक्सिस बँक कर्ज मर्यादा मंजूर करेल. त्यानंतर संबंधित ग्राहक त्याच्या सोयीनुसार मासिक परतफेडची क्षमता लक्षात घेऊन त्यांच्या पसंतीची कर्जाची रक्कम आणि परतफेडीची पद्धत निवडू शकतात.
यामध्ये कर्जाचा अर्ज मंजूर करण्यापूर्वी फ्लिपकार्ट पुनरावलोकनाकरिता सर्व समावेशक कर्ज सारांश, कर्ज परतफेडीचा तपशील आणि इतर अटी व शर्ती सांगते. नंतर तुमचे कर्ज मंजूर केले जाते. यामध्ये कर्जमुंजूरीची प्रक्रिया अवघ्या तीस सेकंदात पूर्ण होते असे देखील कंपनीचे म्हणणे आहे.