आर्थिक

Fixed Deposit : गुंतवणूकदारांची चांदी! 2 एप्रिल पासून ‘या’ बँकांनी वाढवले एफडीवरील दर…

Fixed Deposit : केंद्रीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आर्थिक वर्ष 2024-25 साठीच्या चलनविषयक धोरण समितीची पहिली बैठक आज म्हणजेच 3 एप्रिलपासून सुरू होत आहे. ही समिती 5 एप्रिलला आपला निर्णय जाहीर करणार आहे. म्हणजेच एफडीवरील व्याज वाढणार की नाही याचा निर्णय 5 एप्रिलला होणार आहे. RBI ने रेपो रेट वाढवल्यास FD वरील व्याज वाढेल. पण रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाआधीच काही लघु वित्त बँका FD वर 9 टक्के व्याज देत आहेत. कोणत्या आहेत त्या बँका पाहूया…

शिवालिक स्मॉल फायनान्स बँक

शिवालिक स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य नागरिकांना 3.50 ते 8.70 टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर 4 टक्के ते 9.20 टक्के दरम्यान आहे. 24 महिने 1 दिवस ते 36 महिने FD वर कमाल व्याजदर 8.70 टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कमाल व्याज दर 9.20 आहे. हे दर 2 मार्च 2024 पासून लागू आहेत.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य नागरिकांसाठी 4 टक्के ते 9.01 टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 4.40 टक्के ते 9.25 टक्के दरम्यान आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी, ते 2 वर्षे 1 महिना (25 महिने) कालावधीसाठी 9.01 टक्के आणि 9.25 टक्के कमाल व्याजदर देत आहे. हे दर 1 मार्च 2024 पासून लागू आहेत.

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक 366-1,095 दिवसांच्या FD वर 7.75 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.5 टक्के व्याज देत आहे. हे व्याज 5 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर उपलब्ध आहे. बँक नियमित आणि ज्येष्ठ नागरिकांना 400 दिवसांच्या ठेवींवर अनुक्रमे 8.4 टक्के आणि 9.15 टक्के व्याज देत आहे. 5 कोटी रुपयांपर्यंतच्या FD आणि 555-1,111 दिवसांच्या कालावधीसाठी, बँक नियमित ग्राहकांना 8.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.25 टक्के व्याज देते.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य नागरिकांना 3.75 टक्के ते 8.50 टक्के व्याज देत आहे. 15 महिन्यांच्या FD साठी कमाल व्याज दर 8.50 टक्के आहे. याच कालावधीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी कमाल व्याज दर 9 टक्के आहे. हे दर 7 मार्च 2024 पासून लागू झाले आहेत.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts