Post Office : सध्या मार्केटमध्ये अनेक गुंतवणूक योजना आहेत, पण या योजना जोखमीच्या योजना आहेत, म्हणूनच बरेच लोक अशा ठिकणी पैसे गुंतवणे टाळतात, पण जर तुम्ही पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला उत्तम परताव्यासह पैशांची सुरक्षितता देखील मिळते. पोस्टात जमा केलेल्या पैशांची हमी क्रेंद्र सरकार घेते म्हणून या योजना सर्वात सुरक्षित मानल्या जातात. यापैकीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना.
या योजनेत वार्षिक 7.4 टक्के दराने व्याज दिले जात आहे. या सरकारी योजनेत गुंतवणूकदारांना दरमहा ठेवींवर व्याज दिले जातात. व्याजाची रक्कम गुंतवणूकदाराच्या पोस्ट ऑफिस खात्यात दिली जाते. लक्षात घ्या पोस्ट ऑफिसच्या या योजनेत टीडीएस कापला जातो. येथून मिळालेले व्याजाचे पैसे हे करपात्र आहेत.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत, एखादी व्यक्ती त्याच्या खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करू शकते. याशिवाय जॉइंट अकाउंटमध्ये 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा केली जाते. गुंतवणूकदाराची इच्छा असल्यास, एकूण रक्कम 5 वर्षांच्या मुदतीनंतर परत केली जाईल.
ते 5 वर्षांसाठी गुंतवणूक आणखी वाढवू शकतात आणि दर 5 वर्षांनी पैसे काढू देखील शकतात. खात्यावर मिळणारे व्याज दर महिन्याला पोस्ट ऑफिस बचत खात्यात दिले जातात.
या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये तुम्ही 9 लाख रुपये जमा करू शकता. यानंतर गुंतवणुकीवर ७.४ टक्के दराने व्याज दिले जाते. यामध्ये 5 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी देण्यात आला आहे. यावर 3 लाख 33 हजार रुपये व्याज मिळते. म्हणजे दर महिन्याला 5550 रुपये उत्पन्न आहे.
पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीममध्ये मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढण्याचाही नियम आहे, जर गुंतवणूकदारांना मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढायचे असतील तर ही सुविधा गुंतवणुकीच्या 1 वर्षानंतर उपलब्ध आहे. त्यापूर्वी नाही. प्री-मॅच्युअर क्लोजरच्या बाबतीत गुंतवणूकदाराला दंड भरावा लागतो. या अंतर्गत 1 ते 3 वर्षात पैसे काढता येतात. त्याच वेळी, ठेवीतून 2 टक्के रक्कम कापून परत केली जाते.