Under 15 Thousand Budget Smartphone:- स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये तुम्हाला अनेक बजेट स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दिसून येते. अगदी आठ हजारापासून ते तीस हजार रुपये पर्यंत देखील तुम्हाला चांगल्यात चांगले स्मार्टफोन मिळू शकतात व तेही ब्रँडेड कंपन्यांचे.
कारण प्रत्येक ग्राहक परवडणाऱ्या किमतीमध्ये चांगला स्मार्टफोन मिळेल या इच्छेने स्मार्टफोनची निवड करत असतात. प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याला कमी पैसा जाऊन चांगली वस्तू मिळेल व त्या दृष्टिकोनातून स्मार्टफोनची देखील निवड केली जात असते.
अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला देखील जर कमीत कमी बजेटमध्ये स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल व तुमचा बजेट जर 15 ते 20 हजाराच्या आसपास असेल तर या लेखामध्ये काही उत्तम अशा 5G स्मार्टफोन विषयी थोडक्यात माहिती दिली आहे व ते तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतात.
कमीत कमी बजेटमधील उत्तम आहेत हे स्मार्टफोन
1- रियलमी नारझो 70 5G स्मार्टफोन- सोशल मीडियाचा वापरापासून तर गेमिंग पर्यंत सगळ्याच वैशिष्ट्यांनी हा फोन उत्तम असून याला तुम्ही ॲमेझॉनच्या माध्यमातून अगदी कमीत कमी किमतीत खरेदी करू शकतात व या ठिकाणी याची किंमत 12998 रुपये इतकी आहे.
या व्यतिरिक्त जर आपण कॅमेऱ्याच्या दृष्टिकोनातून या फोनची वैशिष्ट्ये पाहिली तर याला 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे व बॅटरी देखील पावरफुल असून ती 5000 mAh इतक्या क्षमतेची आहे. ही बॅटरी तुम्हाला 45W च्या सुपरवूक चार्जिंगने देखील चार्ज करता येते.
2- सॅमसंग गॅलेक्सी एम 15 5G स्मार्टफोन- तुम्हाला जर वापरायला सोपा आणि चांगला आणि सिम्पल लूक असलेला स्मार्टफोन हवा असेल व तोही तुमच्या बजेटमध्ये तर सॅमसंगचा हा स्मार्टफोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो व त्यामध्ये सहा जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज दिला आहे.
पावर बॅकअप करिता 6000 mAh ची बॅटरी यामध्ये दिली असून उत्तम फोटोग्राफी करिता 50 मेगापिक्सल, पाच आणि दोन मेगापिक्सल असे तीन सेन्सर कॅमेरे देखील दिले आहेत. उत्तम सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग करिता तेरा मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून हा स्मार्टफोन तुम्ही ॲमेझॉन वर 14,499 मध्ये खरेदी करू शकतात.
3- रेडमी 13 5G स्मार्टफोन- ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर जर बघितले तर या स्मार्टफोनचे सहा जीबी रॅम, आठ जीबी रॅम( 128 जीबी ROM), आठ जीबी रॅम( 256 जीबी ROM) असे तीन सेगमेंट सध्या उपलब्ध असून या तीनही सेगमेंटची जर किंमत पाहिली तर ती 12,700 पासून सुरू होते तर पंधरा हजार सहाशे रुपये पर्यंत आहे.
या फोनमध्ये तुम्हाला 108 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळतो व तो दोन मेगापिक्सलच्या मॅक्रो कॅमेरा सोबत येतो. उत्तम सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग करीता यामध्ये तेरा मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये उत्तम पॉवर बॅकअप मिळावा याकरिता 5030 mAh ची बॅटरी दिली असून ते 30 W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
4- रियलमी 12 5G स्मार्टफोन- हा स्मार्टफोन देखील कमी बजेट स्मार्टफोन असून उत्तम फीचर्स असलेला स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला आठ जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व आठ जीबी रॅम आणि त्यासोबत 206 जीबी स्टोरेज असे दोन पर्याय मिळतात.
हा फोन अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. कॅमेराच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये 108 मेगापिक्सलचा 3X झूमवाला पोट्रेट रियर कॅमेरा दिलेला आहे. जर या स्मार्टफोनची ॲमेझॉन वरील किंमत पाहिली तर फक्त 13999 रुपये आहे.