आर्थिक

Multibagger Stocks : एका शेअरसाठी 3 बोनस शेअर्सची भेट, ‘या’ छोट्या शेअरमध्ये तुफान तेजी!

Multibagger Stocks : जर तुम्ही सध्या चांगल्या शेअरच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची आहे. आज आम्ही अशा एका शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने गेल्या काही काळापासून आपल्या गुंतवणूकदारांना भरपूर परतावा दिला आहे.

आम्ही येथे स्मॉल कॅप कंपनी रेमिडियम लाइफकेअरच्या शेअर्सबद्दल बोलत आहोत. रेमिडियम लाइफकेअरचे शेअर्स शुक्रवारी 20 टक्केने वाढून 20.94 रुपये झाले आहेत. तसेच कंपनी 3:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देखील देत आहेत. म्हणजेच, कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरमागे 3 बोनस शेअर्स देईल. रेमिडियम लाईफकेअर शेअर्स शुक्रवार, 5 जुलै रोजी एक्स-बोनस ट्रेडिंग करत आहेत.

रेमिडियम लाईफकेअरने गेल्या वर्षी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सची भेटही दिली होती. कंपनीने जुलै 2023 मध्ये 9:5 च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते. म्हणजेच कंपनीने प्रत्येक 5 शेअर्समागे 9 बोनस शेअर्स दिले होते.

अलीकडेच, Remedium Lifecare ने त्याचे शेअर्स दोनदा विभागले आहेत. कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये रु. 10 चे दर्शनी मूल्य असलेले शेअर रु 5 चे दर्शनी मूल्य असलेल्या 2 शेअर्समध्ये विभागले. यानंतर, कंपनीने फेब्रुवारी 2024 मध्ये 5 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स 1 रुपये दर्शनी मूल्याच्या 5 शेअर्समध्ये विभागले आहेत.

गेल्या पाच वर्षाचा परतावा

रेमिडियम लाइफकेअरच्या शेअर्समध्ये गेल्या 5 वर्षांत 2730 टक्के वाढ झाली आहे. स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स 1 जुलै 2019 रोजी 74 पैशांवर होते. 5 जुलै 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 20.94 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 2 वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 329 टक्के वाढ झाली आहे. 2 वर्षांत, रेमिडियम लाइफकेअरचे शेअर्स 4.89 रुपयांवरून 20 रुपयांपर्यंत वाढले आहेत.

कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 44.92 रुपये आहे. त्याच वेळी, रेमिडियम लाइफकेअर शेअर्सचा 52 आठवड्यांचा निच्चांक 14.63 रुपये आहे. Remedium Lifecare चे मार्केट कॅप रु 844 कोटी आहे. कंपनीत सार्वजनिक भागीदारी 98.89 टक्के आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts