आर्थिक

सोने आणि चांदीच्या दराने सुरू केला परत वाढीच्या दिशेने प्रवास! खरेदी करायचे असेल सोने तर जाणून घ्या आजचे सोन्याचे भाव

Gold-Silver Price:- सध्या लग्नसराईचा कालावधी सुरू असून या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदीची खरेदी केली जाते. परंतु सध्या जर सोने आणि चांदीचे बाजारपेठ बघितली तर या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये वाढीचा ट्रेंड दिसून येत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्या बाहेर सोने आणि चांदीची खरेदी गेल्याचे दिसून येत आहे.

परंतु लग्न समारंभ असल्यामुळे तरी देखील सोने चांदीच्या खरेदी करिता ग्राहकांची गर्दी सध्या दिसून येत आहे. मागणी चांगली असल्यामुळे सोने-चांदीच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे.

परंतु गेल्या दोन ते तीन दिवसाचा विचार केला तर सोन्याच्या आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज नेमके सोने- चांदीचे दर कसे आहेत याबाबत माहिती घेऊ.

किती आहेत सोने आणि चांदीचे दर?
इंडिया बुलियन मार्केटच्या वेबसाईट नुसार बघितले तर आज सोने आणि चांदीच्या दरामध्ये काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज 22 कॅरेटसाठी दहा ग्रॅम सोन्याची किंमत 70382 रुपये आहे तर 24 कॅरेट करिता ती 76 हजार 780 रुपये प्रति तोळा इतकी आहे.

तसेच जर आपण चांदीचे दर पाहिले तर आज दहा ग्रॅम चांदीची किंमत 928 रुपये तर प्रतिकिलो 92 हजार 830 रुपये इतके चांदीचे दर आहेत.

कालच्या म्हणजेच पाच डिसेंबरच्या दराच्या तुलनेत आज सोन्याचे दर पाहिले तर त्यामध्ये प्रति तोळा 260 रुपयांनी वाढ झाली आहे तर चांदी प्रतिकिलो 600 रुपयांनी महाग झाली आहे.

जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे दर

1- मुंबई शहर- मुंबईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 70253 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 76 हजार 640 रुपये आहे.

2- पुणे शहर- पुण्यात आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 70253 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 76,640 रुपये प्रति तोळा इतका आहे.

3- नागपूर शहर- नागपूर मध्ये 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर बघितले तर प्रतितोळा 70,253 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 76 हजार 640 रुपये इतका आहे.

4- नाशिक शहर- नाशिक येथे 22 कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा 70253 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 76 हजार 640 रुपये इतका आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts