Gold Loan Vs Personal Loan : महागाईने अलीकडे सर्वसामान्यांचे पार कंबरडे मोडले आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की आता महिन्याकाठी हाती येणारा पगार संसाराच्या मूलभूत गरजा भागवण्यातच संपत आहे.
यामुळे आता पैशाची अचानक गरज उद्भवली तर सर्वसामान्यांच्या माध्यमातून बँकेची दरवाजे ठोठावली जातात. ताबडतोब पैशाची गरज भासली तर आपल्यापैकी अनेक जण कर्ज घेतात. अलीकडे बँकांच्या माध्यमातून वेगवेगळी कर्ज सहजतेने उपलब्ध करून दिली जात आहेत.
यामध्ये गोल्ड लोन आणि पर्सनल लोन हे दोन लोन ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय बनले आहेत. ताबडतोब पैसे हवे असतील तर हे कर्ज घेणे सर्वसामान्यांना परवडत आहे. पण अनेकांच्या माध्यमातून गोल्ड लोन घेणे फायदेशीर की पर्सनल लोन घेणे फायदेशीर हा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कर्ज मंजूर होण्याची शक्यता : जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पर्सनल लोन हे असुरक्षित कॅटेगिरी मध्ये येते. यामुळे अशा प्रकारचे कर्ज देताना बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या घटकांचा विचार केला जातो. पर्सनल लोन साठी क्रेडिट स्कोर, मंथली इन्कम ऍक्युपेशन अर्थातच व्यवसाय यांसारख्या वेगवेगळ्या घटकांचा विचार केला जातो.
या सर्व घटकांमध्ये कर्ज घेणारा व्यक्ती उत्तम आढळला तर त्याला कर्ज मंजूर होते. दरम्यान क्रेडिट स्कोर किंवा इतर गोष्टी कर्जदाराच्या फेवरमध्ये नसतील तर त्याला कर्ज नामंजूर देखील होऊ शकत. दुसरीकडे गोल्ड लोन हे सेक्युअर प्रकारातील कर्ज आहे.
हे कर्ज फेडण्यात जर कर्ज घेणारां व्यक्ती अपयशी ठरला तर त्याचे सोनं विकून कर्जाची रक्कम वसूल केली जाऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारचे कर्ज लवकर मंजूर होते. ज्या लोकांचा कमी सिबिल स्कोर आहे त्यांना देखील गोल्ड लोन मिळू शकते. यामुळे जर तुमचा सिबिल स्कोर लो असेल तर गोल्ड लोन तुम्हाला सहजतेने मिळू शकणार आहे.
व्याजदर : वैयक्तिक कर्जासाठी व्याजदर 10.5% पासून सूरु होतात. काही सार्वजनिक क्षेत्रातील बँका याहीपेक्षा कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देतात. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार जर एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोर चांगला असेल तर पर्सनल लोन आणि गोल्ड लोन याचे व्याजदर जवळपास सारखेच राहते.
पण जर सिबिल स्कोर एखाद्या व्यक्तीचा कमी असेल तर अशावेळी गोल्ड लोनचे व्याजदर हे वैयक्तिक कर्जापेक्षा कमी राहते. किती कर्ज मिळते : वैयक्तिक कर्ज हे 50 हजारापासून ते 15 लाखापर्यंत मंजूर होऊ शकते.
काही बँकां याही पेक्षा अधिक कर्ज देऊ शकतात. मात्र यासाठी व्यक्तीची क्रेडिट प्रोफाइल तेवढी मजबूत असणे आवश्यक आहे. दुसरीकडे गोल्ड लोन जेवढे गोल्ड असेल त्याच्या किमतीच्या 75% पर्यंत मंजूर होऊ शकते. यापेक्षा जास्त कर्ज गोल्ड लोन अंतर्गत मिळत नाही.
कर्जाचा कालावधी : वैयक्तिक कर्ज एका वर्षापासून ते पाच वर्षांच्या काळापर्यंत दिले जाते. काही बँका सात ते आठ वर्षांच्या कालावधीसाठी हे कर्ज देतात. दुसरीकडे गोल्ड लोन बाबत बोलायचं झालं तर बँका साधारणतः कमाल तीन वर्षांच्या कालावधीसाठी गोल्ड लोन देतात.
तर काही बँका चार ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी हे लोन देऊ शकतात. किती दिवसात मिळतं कर्ज : गोल्ड लोन ताबडतोब मिळू शकत. ज्या दिवशी गोल्ड लोन घ्यायला गेले त्याच दिवशी हे कर्ज मंजूर होऊ शकते.
मात्र वैयक्तिक कर्जासाठी सात ते आठ दिवसांचा कालावधी लागतो. बँका वैयक्तिक कर्ज देताना कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची सर्व क्रेडिट प्रोफाइल चेक करतात यामुळे वैयक्तिक कर्जासाठी अधिक वेळ लागतो.