आर्थिक

Gold Price: 73 हजारावरून सोने जाईल सरळ 80 हजारापर्यंत आणि चांदीला देखील येथील सुगीचे दिवस! वाचा काय आहे त्यामागील कारणे?

Gold Price:- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै रोजी जो काही आर्थिक बजेट सादर केला होता त्यामध्ये त्यांनी सोन्याच्या आयात शुल्कात 15 टक्क्यांवरून थेट सहा टक्क्यांपर्यंत कपात केली होती. त्यानंतर काही तासातच सोन्याच्या दरात घसरण व्हायला सुरुवात झाली होती व अर्थसंकल्पानंतरच्या चार दिवसात सोन्याच्या दरात 6.95 टक्क्यांनी घसरण होऊन ते  साधारणपणे 68,131 रुपये प्रतितोळा झाले होते.

परंतु आता अर्थसंकल्प सादर होऊन 50 दिवस उलटले असतील व या कालावधीत मात्र सोन्याच्या दरात परत उसळी घेतल्याचे पाहायला येत असून या कालावधीमध्ये सोने 7.21 टक्क्यांनी महागले आहे व 73 हजारच्या पातळीवर पोहोचले आहे. त्यामुळे नेमके सोन्याच्या दरात वाढवल होण्याचे काय कारणे आहेत येणाऱ्या कालावधीत काय स्थिती राहील? याबद्दलची माहिती थोडक्यात बघू.

 सोने आणि चांदीच्या दारात होईल वाढ

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्याच्या आयात शुल्कात घट करून ते 15 टक्क्यांवरून तब्बल सहा टक्क्यांवर आणले होते व यामुळे सोन्याच्या दरात अर्थसंकल्पा नंतर 6.95% ने घसरून ते ६९१३१ रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत पोहोचले होते.

परंतु त्यानंतरच्या कालावधीत सोन्यात परत 7.21 टक्क्यांची वाढ झाली व 50 ते 53 दिवसाच्या कालावधीत ते 73 हजारांच्या पातळीवर पोहोचले आहे. अर्थसंकल्पापूर्वी बघितले तर 21 जुलै रोजी सोने 74 हजार 214 रुपये प्रति दहा ग्रॅम या दरावर होते. याबद्दल जर आपण अमेरिकी इन्वेस्टमेंट फर्म गोल्डमॅन सॅक्स यांच्यानुसार बघितले तर त्यांच्या मते सोन्याच्या किमतीत आतापर्यंत 20 टक्क्यांची वाढ झाली असून आतापर्यंत ते 2582 डॉलर प्रति औंस आहे व येणाऱ्या दिवसात वाढीची शक्यता यामध्ये दिसून येत आहे.

यामागील तर प्रमुख कारण पाहीले तर फेडरल रिझर्व व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहेच व वाढत्या बाजारांच्या केंद्रीय बँकांमध्ये देखील सोन्याचा साठा जमा होत आहे. या दोन्ही कारणांमुळे पुढील वर्षाच्या सुरुवातीस किंमत 2700 प्रति औंस एक पर्यंत पोहोचू शकते.

 तज्ञांचे काय आहे मत?

आयआयएफएल सिक्युरिटीचे उपाध्यक्ष( रिसर्च) अनुज गुप्ता यांच्या मते या वर्षाच्या शेवटी पर्यंत सोने 78 ते 80 हजार रुपयापर्यंत पोहोचू शकते. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये जर काही लोकांना लग्नासाठी सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर ते सोन्याचे दर कमी झाल्यावर खरेदीच्या संधी यामध्ये पाहू शकतात.

तसेच केडिया अडवायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या मते जर बघितले तर शेअर बाजारातील मूल्यांकन जास्त आहे व अशा स्थितीत गोल्ड ईटीएफ मधील गुंतवणूक वाढलेली आहे या सगळ्या परिस्थितीचा परिणाम हा सोने दरवाढीत होऊ शकतो.

 ही आहेत सोने दरवाढी मागील प्रमुख कारणे?

1- 11 ते 18 सप्टेंबर रोजी युएस फेड बैठकीत व्याजदर कपातीचे अपेक्षा असल्यामुळे

2- डॉलर इंडेक्स 101.03 या एका वर्षाच्या निचंकी पातळीवर

3- जागतिक परिस्थितीत असलेले भूराजकीय तणाव यामुळे सोन्याला पाठिंबा मिळताना दिसून येत आहे.

4- अमेरिकेत होऊ घातलेले अध्यक्ष निवडणुकीमुळे राजकीय अस्थिरता देखील कारणीभूत ठरत आहे.

5- जागतिक परिस्थितीत अनिश्चितता असल्यामुळे देखील गोल्ड इटीएफ मधील  गुंतवणुकीत वाढ होत आहे.

6- चीन आणि युरोप मधील व्याजदर कपातीमुळे सोन्यातील गुंतवणुकीत वाढ होऊ शकते.

7- तसेच भारतामध्ये सध्या सणासुदीच्या कालावधी असल्याने मागणी आणि केंद्रीय बँका देखील सोन्याची खरेदी करत आहेत.

  इलेक्ट्रिक वाहन उत्पादक क्षेत्रामुळे चांदीला देखील येतील चांगले दिवस

चांदीचे दर सध्या 2912 रुपयांनी वाढून ते 86 हजार 100 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. सॅमसंग या प्रमुख कंपनीने अलीकडेच एक ईव्ही बॅटरी तयार केली असून ती नऊ मिनिटात चार्ज होते. या बॅटरी मध्ये कंपनीने चांदीचा वापर केला असून या बॅटरींचा वापर जर वाढला तर चांदीची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जागतिक पातळीवर जर बघितले तर जगात वर्षाला आठ कोटी इलेक्ट्रिक कार तयार होतात. जर यामध्ये 20% कार बॅटरी वापरत असतील तर 1.6  कोटी कार असतील ज्यांच्या बॅटरीमध्ये एक किलो चांदी वापरली जाईल.

कारण एका बॅटरी मध्ये एक किलो चांदी असते. या हिशोबाने जर बघितले तर 16000 टन चांदीची यासाठी आवश्यकता भासेल व ते एकूण चांदीच्या उत्पादनाच्या 60 टक्के आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात चांदीच्या दरात देखील वाढ होऊ शकते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts