Gold Silver Price Today : सर्वत्र लग्नसराईचा उत्साह दिसून येत आहे. या सर्व धामधुमीत सोन्या-चांदीच्या दरातही चढ-उतार होताना दिसत आहेत. अशातच जर तुमच्या घरात फेब्रुवारीमध्ये कोणतेही कौटुंबिक समारंभ किंवा लग्न असेल आणि तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जात असाल, तर आधी 31 जानेवारी रोजी म्हणजे आज सोन्याचा भाव काय आहे जाणून घ्या.
आज बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात कालपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळत आहे. नव्या किमतीनंतर आज सोन्याचा भाव 63000 तर चांदीचा भाव 76000 च्या वर गेला आहे. अशातच आज सोने खरेदी करणे तुम्हाला महाग पडणार आहे. चला काही मुख्य शहरांमध्ये सोन्याचा आणि चांदीचा भाव काय आहे पाहूया…
बुधवार, सोन्याचे नवीन रेट
बुधवारी सराफा बाजाराने जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, आज 31 जानेवारी रोजी, 22 कॅरेट सोन्याचा भाव 58, 150 रुपये, 24 कॅरेट 63,420 रुपये आणि 18 ग्रॅम 47580 वर ट्रेंड करत आहे. तर 1 किलो चांदीची किंमत 76200 रुपये आहे.
मुख्य शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत
आज बुधवारी 22 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, दिल्ली सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,650 रुपये आहे. तर मुंबई सराफा बाजारात बाजार 58,150/- रुपये आणि पुण्यात 58,500 रुपयांवर व्यवहार करत आहे.
24 कॅरेट सोन्याची किंमत
24 कॅरेट सोन्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले दिल्लीमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,420/- रुपये आहे, मुंबई सराफा बाजारात किंमत 63,270/- रुपये आणि पुणे सराफा बाजारात किंमत 62,950 रुपये अशी आहे.
1 किलो चांदीची किंमत
आज बुधवारी, जर आपण जयपूर कोलकाता अहमदाबाद लखनौ मुंबई दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किंमतीबद्दल बोललो तर, 01 किलो चांदीची किंमत 76500/- आहे, तर पुण्यात 78,000 रुपये आहे.