Gold Silver Price Today : आज सोन्या-चांदीच्या किंमती पुन्हा वाढताना दिसल्या, कालच्यापेक्षा आज सोने-चांदी महागले आहे. आज २९ जानेवारी रोजी सोन्याच्या दरात 10 ग्रॅममागे 100 रुपयांची, तर चांदीच्या दरात 200 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. नव्या किमतींनंतर सोन्याचा भाव 63000 तर चांदीचा भाव 76000 च्या वर गेला आहे.
सराफा बाजाराने सोमवारी जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, आज 29 जानेवारी रोजी, 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,950 रुपये, 24 कॅरेटचा भाव 63,200 रुपयांवर ट्रेंड करत आहे आणि 18 ग्रॅम 47,410 रुपयांवर ट्रेंड करत आहे. त 1 किलो चांदीची किंमत 76200 रुपये आहे.
मुख्य शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत
आज सोमवारी 22 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा आजचा भाव 58,448 रुपये आहे. तर मुंबई सराफा बाजारात 57,950/- रुपये. तर पुण्यात 58,905 रुपये असा आहे.
मुख्य शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव
सोमवारच्या 24 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर आज दिल्लीमध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63,807 रुपये आहे, मुंबई सराफा बाजारात किंमत 63,050/- रुपये, आणि पुणे सराफा बाजारात किंमत 64,306 रुपये अशी आहे.
1 किलो चांदीची नवीनतम किंमत
आज सोमवारी, मुंबई, दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किंमतीबद्दल बोललो तर, 01 किलो चांदीची किंमत 76200/- आहे, तर पुणे बाजारात 77,500 रुपये आहे.
सोने खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा !
-सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ द्वारे हॉल मार्क दिले जातात.
-24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले आहे.
-साधारणपणे 20 आणि 22 कॅरेटमध्ये सोने विकले जाते, तर काही लोक दागिन्यांसाठी 18 कॅरेट देखील वापरतात.
-24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.
-24 कॅरेटमध्ये भेसळ नाही, त्याची नाणी उपलब्ध आहेत, मात्र 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवता येत नाहीत, त्यामुळे बहुतांश दुकानदार 18, 20 आणि 22 कॅरेटचे सोने विकतात.