Share Market News : देशातील शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षांमध्ये बाजारातून चांगला परतावा मिळाला आहे. तेजीमुळे गुंतवणूकदार चांगलेच मलामाल बनले आहेत. दरम्यान भारतीय शेअर मार्केटमध्ये सध्या मोठी तेजी पाहायला मिळत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालात भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे.
पाच राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये बीजेपी ने बहुमत मिळवले आहे. छत्तीसगड राजस्थान आणि मध्यप्रदेश या तीन राज्यात बीजेपी ने बहुमत स्थापित केले आहे. तेलंगाना मध्ये मात्र काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत तब्बल दीड दशकांनंतर तेथे आपले सरकार स्थापित केले आहे. अशातच आता निकाल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात विक्रमी तेजी आली आहे.
मात्र असे असले तरी गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारातील ही तेजी आणखी किती दिवस कायम राहणार, शेअर मार्केट असेच तेजीत राहणार का ? हा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच शेअर मार्केट मधील या विक्रमी तेजीबाबत मोतीलाल ओसवाल समूहाचे अध्यक्ष आणि को फाउंडर रामदेव अग्रवाल यांनी एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय उद्योगपती, शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार म्हणून प्रसिद्ध अग्रवाल यांनी भारतीय शेअर बाजारात पुढील चार ते पाच वर्षे अशीच तेजी राहण्याची शक्यता वर्तवली आहे. अग्रवाल यांनी CNBC-TV18 या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत असा अंदाज बांधला आहे. तसेच त्यांनी शेअर मार्केट बाबत अधिक माहिती देताना सांगितले की, सरकार आता विकासासाठी मोठा खर्च करणार आहे. यामुळे साहजिक शेअर बाजाराच्या वाढीलाही मदत मिळणार आहे.
ते म्हणतात की, जेव्हा कर संकलन वाढते तेव्हा सरकारला खर्च करण्याचे स्वातंत्र्य असते. तसेच जेव्हा सरकारकडे कर संकलन वाढते तेव्हा सरकारकडे खर्च करण्यासाठी अनेक गोष्टी असतात. तथापि या मुलाखतीत रामदेव अग्रवाल म्हणाले की, अर्थव्यवस्था किती चांगली कामगिरी करते आणि सरकार कर कसे गोळा करते यावर लक्ष केंद्रित करण्याची गोष्ट आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका नंतर भारतीय शेअर बाजारात आलेल्या तेजीवर अधिकची माहिती देताना अग्रवाल यांनी सांगितले की शेअर बाजारातील ही तेजी अशीच कायम ठेवणे कठीण राहणार आहे. तसेच शेअर बाजारात विक्रमी तेजी आली असल्याने काही काळ बाजार सुस्त पडू शकतो. पण बाजारातील ही तेजी 2024 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत कायम राहणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या दोन ते अडीच दशकांच्या काळात भारतीय शेअर बाजार आतून 12 ते 15 टक्क्यांचे रिटर्न मिळाले आहेत. रामदेव यांनी हे भारताचे दशक आता कॉर्पोरेट क्षेत्रातला नफा सुद्धा 15 ते 17 टक्के तेजीने वाढेल असे मत नमूद केले आहे.