Bank FD Rates : एफडी सर्वात सुरक्षित आणि लोकप्रिय गुंतवणूक आहे. भारतातील जवळ-जवळ प्रत्येक व्यक्तीची एफडीमध्ये गुंतवणूक आहे. अशातच तुम्ही सध्या एफडी करण्याचा विचार असाल तर देशातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकेने आपल्या एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत. यामुळे तुम्हाला आता दुप्पट फायदा होणार आहे.
एचडीएफसी बँकेच्या देशभरात ७,९०० पेक्षा जास्त शाखा आहेत. सुमारे 20 हजार एटीएम आहेत. ही भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक देखील मानली जाते. अशातच HDFC बँकेने 27 नोव्हेंबर रोजी न काढलेल्या मुदत ठेवींवरील व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे. तुमच्या माहितीसाठी नॉन-विथड्रॉल FD मध्ये मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी नाही. म्हणजे निर्धारित कालावधीपूर्वी रक्कम काढता येणार नाही. यामध्ये तुम्ही 2 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक गुंतवणूक करू शकता. हे फक्त भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहे.
2 वर्षांपेक्षा कमी FD साठी व्याज
बँक एक ते दोन वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहे. 2 कोटी ते 5 कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 7.45% व्याज दिले जात आहे. बँक 1 वर्ष ते 15 महिन्यांच्या ठेवींवर 7.45% व्याज देत आहे. 15 महिने ते 18 महिने, 18 महिने ते 21 महिन्यांपेक्षा कमी, 21 महिने ते 2 वर्षांच्या FD साठी दर समान आहेत.
2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी व्याज दर
2 ते 10 वर्षात परिपक्व होणाऱ्या FD वर सुमारे 7.20% परतावा दिला जात आहे. 2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे, 3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे आणि 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षांच्या FD साठी व्याजदर समान आहेत.
2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर किती व्याज मिळत आहे?
जर आपण 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD बद्दल बोललो तर, HDFC बँकेने 1 ऑक्टोबर 2023 रोजी अखेरचे व्याजदर हे बदलले आहेत. सध्या बँक, 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3% ते 7.20% पर्यंत व्याज ऑफर करत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ०.५०% अधिक व्याज मिळत आहे. सर्वाधिक परतावा 4 वर्षे, 7 महिने ते 55 महिन्यांच्या ठेवींवर उपलब्ध आहे.