FD Interest Rate Hike : आपल्या देशात शेअर मार्केटमध्ये तसेच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याऐवजी सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व आहे. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक इतर गुंतवणुकीच्या तुलनेत अधिकचा परतावा देते. यामुळे काही लोक निश्चितच यामध्ये गुंतवणूक करण्याला पसंती दाखवतात. पण अनेकांना आपली मेहनतीची कमाई जोखीमपूर्ण ठिकाणी गुंतवणूक करण्याची इच्छा नसते. यामुळे असे लोक एलआयसी पोस्ट ऑफिस तसेच बँकेच्या एफडी मध्ये गुंतवणुकीला नेहमीच प्राधान्य देतात.
दरम्यान बँकेत Fix Deposit मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील काही बँका एफडी वरील व्याजदर 10 टक्क्यांपर्यंत वाढवू शकतात. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या स्थितीला देशातील काही स्मॉल फायनान्स बँका एफडीवर 9.5% पर्यंतचे व्याजदर देत आहेत.
दरम्यान या स्मॉल फायनान्स बँका जर रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्थातच आरबीआयने रेपो रेट मध्ये वाढ केला तर हे एफ डी वरील व्याजदर तब्बल दहा टक्क्यांपर्यंत करणार असा दावा केला जात आहे. मात्र काही तज्ञांनी आरबीआय रेपो रेटमध्ये वाढ करणार नाही असे स्पष्ट केले आहे.
या दिवशी होणार RBI ची बैठक
येत्या दोन दिवसात अर्थातच 8 डिसेंबर 2023 रोजी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे. दर दोन महिन्यांनी ही बैठक होत असते. या बैठकीत आरबीआय रेपो रेट संदर्भात फेरविचार करणार आहे. यामध्ये रेपो रेट वाढतील, कमी होतील की कायम राहतील याबाबत निर्णय होणार आहे. पण, तज्ञ लोकांनी यावेळी RBI Repo Rate वाढण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितलं आहे. तसेच दर कपात देखील होणार नाही असा विश्वास तज्ञांना आहे.
RBI च्या शेवटच्या पतधोरण बैठकीत शक्तीकांत दास म्हणाले होते की व्याजदरात आणखी वाढ होण्यास अजून वाव आहे. यामुळे, एफडी चे व्याजदर वाढतील का, FD चे व्याजदर दहा टक्क्यांपर्यंत जाणार का हा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. पण तज्ञ लोकांनी मात्र RBI व्याजदर वाढवणार नसल्याचे सांगितले आहे.
FD च्या व्याजदरात जोपर्यंत आरबीआय रेपो रेटमध्ये बदल करत नाही तोपर्यंत बदल होणार नाही. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवले तर एफडीचे व्याजदर देखील वाढू शकतात.
कोणती बँक देते अधिक व्याजदर
अनेक लघु वित्त बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर ९.२% ते ९.५% व्याज देत आहेत. यामध्ये युनिटी स्मॉल फायनान्स बँक आणि फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक चा देखील समावेश होतो. युनिटी स्मॉल फायनान्स बँक, 1001 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 9.5% व्याजदर देत आहे. तसेच फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक देखील ज्येष्ठ नागरिकांना 750 दिवसांच्या FD वर 9.21% व्याज देत आहे.