अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- टाटा मोटर्स आपली आगामी सीएनजी कार टियागो आणि टिगोरला १९ जानेवारी २०२२ रोजी लाँच करण्यासाठी तयार आहे. मात्र कंपनीने हा खुलासा केला नाही की, कोणत्या सीएनजी कारला सर्वात आधी लाँच केले जाणार आहे.
टाटा मोटर्सच्या आगामी सीएनजी प्रोडक्ट टाटा टिगोर आणि टाटा टियागो सीएनजी कार आहेत. दरम्यान या फॅक्ट्री फिटेड सीएनजी व्हेरियंट कारची बुकिंग डीलरशीप स्तरावर सुरू झाली आहे.
कंपनीने नुकतीच घोषणा केली होती की, आपल्या नवीन सीएनजी व्हेरियंटला १९ जानेवारी रोजी लाँच करण्याची योजना बनवत आहे.
टाटा टियागो सीएनजी मॉडलचा भारतीय बाजारात थेट मारुती सुझुकी वेगनआर सीएनजी, ह्युंदाई सँट्रो सीएनजी सारख्या कारशी टक्कर पाहायला मिळेल.
टाटा टिगोर सीएनजी कारची टक्कर सुझुकीची येणारी सेडान डिझायर सीएनजी आणि ह्युंदाई ऑरा सीएनजी कारशी होईल.
या कारला बुक करण्यासाठी ५ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत लोकशन आणि व्हेरियंटच्या आधारांर टोकन रक्कम द्यावी लागेल.
कंपनीने या सीएनजी कारला लाँच करण्याचा कोणताही अधिकृत दावा करण्यात आला नाही. परंतु, असा अंदाज लावला जात आहे की, या कारला याच महिन्यात लाँच केले जाऊ शकते.