New FD Scheme : अलीकडे गुंतवणुकीसाठी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मोठा लोकप्रिय होत आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी आता नागरिक एलआयसी, पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.
याशिवाय बँकिंग आणि नॉन बँकिंग वित्तीय संस्थांमध्ये एफडी अर्थातच मुदत ठेव करणाऱ्यांची संख्या देखील वाढत चालली आहे. एफडी मध्ये ग्राहकांना निश्चित परतावा मिळत असल्याने आणि एफडी मधील गुंतवणूक हे पूर्णपणे सुरक्षित असल्याने आता एफडीला प्राधान्य दिले जात आहे.
अशातच एफडी करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील बजाज फायनान्स या प्रमुख नॉन बँकिंग वित्तीय संस्थेने नवीन डिजिटल FD योजना जाहीर केली आहे.
विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील सदर नॉन बँकिंग वित्तीय संस्थेच्या माध्यमातून दिला जात आहे. दरम्यान आज आपण बजाज फायनान्स जाहीर केलेल्या या नवीन डिजिटल एफडी योजनेविषयी सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बजाज फायनान्स FD साठी देणार एवढे व्याज
मिळालेल्या माहितीनुसार बजाज फायनान्स या नॉन बँकिंग वित्तीय संस्थेच्या माध्यमातून 42 महिन्यांच्या कालावधीसाठी पाच कोटी रुपयांपर्यंतची FD करणाऱ्या गुंतवणूकदारांना 8.60% एवढे व्याज दिले जाणार आहे.
तसेच या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना अर्थातच 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना 8.85% एवढे व्याज दिले जाणार आहे. कंपनीचे एप्लीकेशन किंवा वेबसाईटच्या माध्यमातून FD करणाऱ्यांना या ऑफरचा लाभ मिळणार आहे.
बजाज फायनान्समध्ये डिजिटल एफडी करणाऱ्यांना तब्बल ८.८५ टक्क्यांपर्यंतचे व्याज दिले जाणार असल्याने गुंतवणूकदारांना या योजनेतून चांगला नफा मिळवता येणार आहे.
1 लाख रुपये गुंतवले तर किती परतावा मिळणार ?
बजाज फायनान्सच्या या डिजिटल एफडीमध्ये जर एखाद्या सर्वसामान्य गुंतवणूकदाराने एक लाख रुपयांची रक्कम गुंतवली तर ८.६० टक्के व्याज दराने 42 महिन्यानंतर सदर गुंतवणूकदाराला एक लाख 30 हजार 100 रुपये मिळणार आहेत.
म्हणजेच 30 हजार 100 रुपये एवढे व्याज सदर गुंतवणूकदाराला मिळू शकणार आहे. पण जर गुंतवणूकदार ज्येष्ठ नागरिक असेल तर 8.85% व्याज दराने सदर गुंतवणूकदाराला एक लाख 30 हजार 975 रुपये मिळणार आहेत याचाच अर्थ सदर गुंतवणूकदाराला 30,975 रुपयांचे व्याज या ठिकाणी मिळणार आहे.