आर्थिक

Google Pay Loan: गुगल पे वर मिळेल तुम्हाला आता ताबडतोब 15 हजार रुपयापर्यंत कर्ज! अशा पद्धतीने करा अर्ज

Google Pay Loan:- व्यक्तीला आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या आर्थिक गरजा अचानकपणे उद्भवू शकतात. यामध्ये कधी कधी फार मोठ्या रकमेची गरज भासते तर कधी कधी दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत देखील आपल्याला पैशाची आवश्यकता भासू शकते.

त्यामुळे अशा परिस्थितीत आपण मित्र किंवा नातेवाईकांचा आधार घेतो किंवा मोठ्या प्रमाणात रक्कम लागत असेल तर आपण बँकेच्या माध्यमातून  किंवा एखाद्या एनबीएफसीकडे कर्जासाठी अर्ज करतो व आपली पैशाची गरज भागवत असतो. तसेच समाजामध्ये असलेले अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांना देखील अचानकपणे छोट्या रकमेची गरज भासू शकते.

अशा छोट्या व्यवसायिकांना मदत व्हावी या दृष्टिकोनातूनच आता गुगल इंडियाने गुगल पे च्या माध्यमातून  कर्ज द्यायला सुरुवात केलेली आहे. या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या 15000 रुपयांपर्यंतचे कर्ज पटकन मिळू शकते. यामध्ये फारच कमीत कमी कागदपत्रे लागतात

व ते देखील ऑनलाइन तुम्हाला प्रोव्हाइड करणे गरजेचे असते. गुगल पे अप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला छोट्या कर्जासाठी कोणत्याही कंपनीच्या कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. गुगलने या छोट्या कर्जांना सॅशे लोन असे नाव दिले आहे. गुगल पे वापरकर्ते गुगल पे च्या माध्यमातून हे कर्ज घेऊ शकतात.

 काय असते सॅशे लोन?

हे एक लहान प्रकाराचे कर्ज असते जे अल्प कालावधी करिता तुम्हाला दिले जाते. साधारणपणे अशा प्रकारची कर्जे हे पूर्व मंजूर असतात.तुम्हाला ते अगदी सहजपणे उपलब्ध होतात. या पद्धतीचे कर्ज दहा हजार रुपयांपासून ते एक लाख रुपये पर्यंत मिळतात व त्याचा परतफेडच्या कालावधी सात दिवसांपासून ते बारा महिन्यांचा असतो. हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला ॲप डाऊनलोड करावे लागेल किंवा तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील याकरिता करू शकतात.

 गुगल पे लोन कुणाला मिळणार?

सध्या कंपनीच्या माध्यमातून टीयर 2 शहरांमध्ये सॅशे लोनची सुविधा उपलब्ध केलेली असून ज्या लोकांचे मासिक उत्पन्न 30 हजार रुपये आहे त्यांना सहजपणे हे कर्ज मिळू शकते.

 गुगल पे कडून

कर्जासाठी कसा अर्ज करावा?

1- प्रथम तुम्हाला तुमचे गुगल पे फॉर बिजनेस ॲप उघडावे लागेल.

2- त्यानंतर कर्ज विभागामध्ये जावे आणि ऑफर टॅबवर क्लिक करावे.

3- त्या ठिकाणी तुम्हाला हवी असलेली कर्जाची रक्कम निवडावी लागते आणि गेट स्टार्ट वर क्लिक करावे लागेल.

4- या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला कर्ज देणाऱ्या भागीदाराच्या वेबसाईटवर पुनर्नीदेशित केले जाईल.

5- त्यानंतर तुमच्या गुगल खात्यात लॉग इन करा व तिथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती देखील द्यावी लागेल. तसेच कर्जाची रक्कम आणि कर्ज कोणत्या कालावधीसाठी घेतले जात आहे हे देखील तुम्हाला ठरवावे लागेल.

6- त्यानंतर तुम्हाला तुमच्या अंतिम कर्ज ऑफरचे पुनरावलोकन करावे लागेल आणि कर्ज करारावर ई स्वाक्षरी करावी लागेल.

7- हे सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला काही केवायसी कागदपत्रे सबमिट करावे लागतील व त्यामुळे तुमची पडताळणी केली जाईल.

8- त्यानंतर तुम्हाला ईएमआय पेमेंट करिता सेटअप इ मॅनडेट किंवा सेटअप NACH वर क्लिक करावे लागेल.

9- हे केल्यानंतर तुम्हाला तुमचा कर्जाचा अर्ज सबमिट करावा लागेल आणि तुम्हाला कर्ज मिळेल.

10- तुम्ही तुमच्या एप्लीकेशनच्या माय लोन या विभागामध्ये तुमच्या कर्जाचा सगळा तपशील किंवा मागोवा घेऊ शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts