Government Investment Scheme:- आपण जे काही पैसे कमवतो त्या पैशांची बचत व भविष्यात आर्थिक सक्षमतेच्या दृष्टिकोनातून त्या पैशांची गुंतवणूक चांगल्या ठिकाणी करणे खूप गरजेचे असते. त्यामुळे बऱ्याच व्यक्ती कमावलेल्या पैशांची गुंतवणूक चांगल्या प्लान मध्ये किंवा योजनांमध्ये करतात.
गुंतवणूक करताना मिळणारे व्याज तसेच परतावा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूक केल्यानंतर तिची सुरक्षितता या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात व या गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच गुंतवणूक करण्याला बरेच जण प्राधान्य देतात. सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
याच पद्धतीने सरकारच्या देखील अशा काही योजना आहेत की त्या देखील गुंतवणुकीसाठी परताव्याच्या दृष्टिकोनातून तसेच मिळणारे व्याज आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत. यामध्ये जर आपण सरकारच्या योजनांचा विचार केला तर सरकारने अनेक शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गुंतवणूकदारांचा उत्साह वाढवण्याकरिता काही महत्त्वाच्या योजनाच्या व्याजदरात देखील सध्या वाढ केलेली आहे.
त्यामुळे नक्कीच लहान आणि दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींचा यामध्ये फायदा होणार हे मात्र निश्चित. त्यामुळे सरकारच्या अशा कोणत्या योजना आहेत की त्यामध्ये तुम्ही एकदा छोट्याशा गुंतवणुकीवर देखील भरघोस असे व्याज मिळवू शकतात.
सरकारच्या या योजना छोट्या गुंतवणुकीवर देतील भरपूर व्याज
1- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना– देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पामध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यमातून महिलांना कमी कालावधीसाठी कमी गुंतवणूक करता यावी म्हणून ही छोटी बचत योजना सुरू करण्यात आलेली आहे. योजनेच्या माध्यमातून महिला एक हजार रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात व यामध्ये गुंतवणुकीचा कालावधी दोन वर्षे इतका ठेवण्यात आलेला आहे.
2- किसान विकास पत्र योजना– केंद्र सरकारच्या माध्यमातून किसान विकास पत्र बचत योजना सुरू करण्यात आलेली असून तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मधून आवश्यक कागदपत्रे देऊन लाभ घेऊ शकतात.
सरकारच्या माध्यमातून या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना 6.9% पर्यंत व्याज देत होते. परंतु आता यामध्ये सरकारने वाढ केली असून यापुढे या योजनेत गुंतवणूक केलेल्या व्यक्तींचे पैसे दुप्पट होण्याचा कालावधी आता कमी होणार आहे. सध्या या योजनेचा व्याजदर 7% इतका असून दर ऑक्टोबर महिन्यापासून लागू होणार आहेत.
3- रिकरिंग डिपॉझिट अर्थात आरडी योजना– या योजनेमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम जमा करणे गरजेचे असते व यावर तुम्हाला बँकेकडून निश्चित दराने व्याज मिळते. तुम्ही जर सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर तुमच्यासाठी आरडी योजना म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट योजना एक उत्तम पर्याय आहे.
4- सुकन्या समृद्धी योजना– सुकन्या समृद्धी योजना ही आपल्याला सगळ्यांना माहिती असलेली योजना असून ही एक छोटी बचत योजना आहे. सरकारच्या माध्यमातून या योजनेवरील व्याजदर आता 8.2% करण्यात आलेला आहे. तीन वर्ष च्या मुदत ठेवीचा दर 7.1% करण्यात आला आहे. त्यामुळे ही योजना देखील खूप फायद्याची अशी योजना आहे.
5- मासिक उत्पन्न योजना– या योजनेच्या माध्यमातून पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही एक ठराविक रक्कम जमा करू शकता व या रकमेवर दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात तुम्हाला उत्पन्न मिळत राहते. या योजनेचा मॅच्युरिटी पिरेड पाच वर्षाचा असून पाच वर्षे झाल्यानंतर तुम्हाला तुमची जमा केलेली रक्कम परत मिळते.
अशाप्रकारे केंद्र सरकारच्या या योजनांमध्ये तुम्ही अगदी कमीत कमी पैशांची देखील गुंतवणूक करून चांगला व्याजदर मिळवू शकतात.