Government Scheme:- समाजातील विविध घटकातील नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना अनेक प्रकारचे आर्थिक लाभ दिले जातात. जेणेकरून त्यांना व्यवसाय उभारता येईल किंवा भविष्यकालीन आर्थिक दृष्टिकोनातून ते स्थिरस्थावर होतील या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो.
आता यामध्ये जर तुम्ही पेन्शन किंवा निवृत्ती वेतनाचा विचार केला तर प्रामुख्याने जे व्यक्ती नोकरी करतात अशा व्यक्तींनाच निवृत्तीनंतर पेन्शन मिळते. परंतु समाजातील सर्वसामान्य नागरिकांना मात्र त्यांच्या वृद्धपाकाळामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून कुणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये या दृष्टिकोनातून प्रयत्न होणे देखील तितकेच गरजेचे आहे
व त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अटल पेन्शन योजना राबविण्यात येत असून या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मासिक 1000 ते 5000 रुपये पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे ही योजना कशी आहे व यासाठी कुठली कागदपत्रे लागतात? याबाबतची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.
काय आहे केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना?
तुम्हाला जर तुमचा उतारवयामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम राहायचे असेल तर अटल पेन्शन योजना ही एक उपयुक्त अशी योजना आहे. ज्या लोकांचे खूपच कमी असे आर्थिक उत्पन्न आहे अशा लोकांसाठी ही योजना लाभदायी आहे. 2022 मध्ये या योजनेत काही कर नियम लागू करण्यात आलेले आहेत व त्यामुळे कर भरणारे लोक या योजनेमध्ये सहभागी होऊ शकत नाही किंवा या योजनेचा लाभ अशा व्यक्तींना मिळू शकत नाही.
या योजनेतून सर्वसामान्य नागरिकांना 1000 ते 5000 रुपयांपर्यंतची मासिक पेन्शन मिळते. याकरिता तुम्हाला फक्त या योजनेत महिन्याला 210 रुपये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. महिन्याला दोनशे दहा रुपये गुंतवणूक करून तुम्ही महिन्याला पाच हजार रुपये पर्यंतची पेन्शन मिळवू शकतात. जर दिवसाला आपण विचार केला तर अवघ्या सात रुपये यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
या योजनेत कोणाला गुंतवणूक करता येते?
किमान 18 ते कमाल 40 वर्ष वय असलेले लोक यामध्ये गुंतवणूक करू शकतात. जेव्हा संबंधित व्यक्तीचे वयाचे साठ वर्षे पूर्ण होतात तेव्हा त्या ग्राहकाने या योजनेत केलेल्या गुंतवणुकीनुसार त्याला एक हजार ते पाच हजार रुपये मासिक पेन्शन मिळते. विशेष म्हणजे जर संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या साथीदाराला म्हणजेच त्याच्या पत्नीला ही पेन्शन दिली जाते.
कसा घ्याल या योजनेचा लाभ?
तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर साठ वर्षानंतर पाच हजार रुपयांची पेन्शन मिळवायची असेल तर मासिक 210 रुपये जमा करावे लागतील. जर प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये मासिक पेन्शन मिळवायचे असेल तर तुम्हाला वयाच्या 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला 42 रुपये यामध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. म्हणजेच कमीत कमी गुंतवणुकीमध्ये तुम्ही तुमचे उतारवयामध्ये पैशांच्या बाबतीत स्वावलंबी होऊ शकतात.