PM Kisan Maandhan Yojana : एका विशिष्ट वयानंतर म्हणजेच वृद्धापकाळात उत्पन्नाचे स्रोत थांबतात. अशास्थितीत अनेक समस्यांना समोरे जावे लागते. सर्वात जास्त शेतकर्यांसाठी कठीण असते. कारण वृद्धापकाळात त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसते. त्यामुळेच मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक विशेष योजना सुरु केली, ज्या अंतर्गत त्यांना पेन्शनचा लाभ मिळेल. सरकारची ही योजना कोणती आहे? आणि ती कशी काम करेल, चला जाणून घेऊया…
जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या वृद्धापकाळासाठी पेन्शनची व्यवस्था करायची असेल, तर सरकार तुम्हाला या गुंतवणूक योजनेत पैसे गुंतवण्याची संधी देत आहे. या योजनेतून तुम्हाला वयाच्या ६० व्या वर्षी ३००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. मोदी सरकार सामाजिक सुरक्षेशी संबंधित अनेक योजना राबवत आहे. त्यातलीच ही एक योजना आहे. आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ती म्हणजे पीएम किसान मानधन योजना. जी खास शेतकऱ्यांसाठी चालू करण्यात आली आहे.
PM किसान मानधन योजना काय आहे ?
पीएम किसान मानधन योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाते. जे आजच्या काळात देशातील अन्नदात्यांसाठी विशेष ठरत आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असणे आवश्यक आहे. या योजनेत सरकार विशिष्ट रक्कम गुंतवून पेन्शन मिळवण्याची संधी देते.
यात लाभ मिळवण्यासाठी जे लोक असंघटित क्षेत्रात काम करतात आणि ज्यांचे मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे. ते लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात, जसे की शिंपी, मोची, रिक्षाचालक, घरकामगार यासारख्या असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर…
पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत पेन्शन कशी मिळवायची?
जर तुम्हाला वार्षिक 36,000 रुपये पेन्शन मिळवायचे असेल, तर तुम्हला वयाच्या 18 व्या वर्षी दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील. ज्याद्वारे तुम्हाला दरमहा 30,000 रुपये पेन्शन मिळू शकते. जर तुमचे वय 40 वर्षे असेल तर तुम्हाला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. या योजनेत 60 वर्षांनंतर मजुराला पेन्शन मिळू लागते.
गुंतवणूक कशी करावी?
पीएम किसान मानधन योजना योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) वर जाऊन नोंदणी करू शकता. तथापि, जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही घरी बसून सरकारी पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करू शकता.