Government Schemes : देशातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. ही विमा योजना सरकारने 2015 मध्ये सुरू केली होती. हा अपघाती विमा वार्षिक 20 रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. कमी उत्पन्न गटातील लोकांना विम्याचा लाभ देण्यासाठी सरकारने PMSBY सुरू केले होते. सरकारच्या मते, या योजनेचा उद्देश लोकांना कठीण काळात मदत करणे हा आहे.
योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत, विमाधारकाचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा संपूर्ण अपंगत्व आणि दोन कायमचे आंशिक अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचे संरक्षण उपलब्ध आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा (PMSBY) फक्त 20 रुपयांमध्ये लाभ घेतल्याने कुटुंबाला संकटकाळी आर्थिक मदत मिळते. 18 ते 70 वयोगटातील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
PMSBY चे लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असल्यास, तुम्ही फक्त एकाच बँकेतून या योजनेचा लाभ घेऊ शकता. दरवर्षी १ जून रोजी किंवा त्यापूर्वी ‘ऑटो डेबिट’ सुविधेद्वारे तुमच्या बँक खात्यातून 20 रुपयांचा प्रीमियम कापला जाईल. अपघातात विमाधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला 2 लाख रुपयांची मदत मिळते. तर अपघातामुळे पूर्ण अपंगत्व आल्यास विमाधारकास 2 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
नावनोंदणी कालावधी
प्रीमियम नूतनीकरणासाठी खात्यात पुरेशी शिल्लक नसल्यास पॉलिसी रद्द केली जाईल. अशा परिस्थितीत, सर्व खातेदारांनी त्यांच्या विमा पॉलिसीचे 31 मे पूर्वी नूतनीकरण केले आहे याची खात्री करावी. विमा प्रीमियमची रक्कम थेट बँक खात्यातून डेबिट केली जाते. त्यामुळे तुमच्या बँक खात्यात किमान २० रुपये ठेवा. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत नावनोंदणीचा कालावधी १ जून ते ३१ मे पर्यंत आहे.