आर्थिक

Government Schemes : आता सरकारच्या ‘या’ योजनेत मिळणार वाढीव व्याज; बघा कोणती?

Government Schemes : केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेतील व्याजात वाढ केली आहे. यापूर्वी, ग्राहकांना योजनेतील गुंतवणुकीवर ८% दराने व्याज दिले जात होते. मात्र, व्याजदर वाढल्यानंतर आता ८.२ टक्के करण्यात आला आहे. योजनेची विशेष गोष्ट म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक करून तुम्ही मोठा फंड तयार करू शकता. हे खाते तुम्ही तुमच्या मुलीच्या नावे उघडू शकता, तुमची मुलगी 10 वर्षांची होईपर्यंत तुम्ही SSY खाते उघडू शकता.

SSY खाते 21 वर्षांत परिपक्व होते. मात्र, मुलगी 18 वर्षांची झाल्यावर शिक्षण किंवा लग्नासाठी खात्यातून रक्कम काढता येते. या प्लॅनमध्ये तुम्हाला दरमहा ४ हजार रुपये वाचवावे लागतील आणि ही रक्कम SSY खात्यात जमा करावी लागेल. समजा तुम्ही 2024 मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि तुमची मुलगी 5 वर्षांची आहे. तर तुम्हाला 2045 मध्ये मजबूत परतावा मिळू शकेल.

तुम्ही दर महिन्याला 4,000 रुपये वाचवल्यास, तुम्ही एका वर्षात 48,000 रुपये गुंतवू शकाल. हे पैसे 15 वर्षांसाठी खात्यात पैसे जमा करावे लागतात. गणनेनुसार, तुम्हाला ही गुंतवणूक २०४२ पर्यंत करावी लागेल. असे केल्याने तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत 7 लाख 20 हजार रुपये गुंतवले असतील.

21 वर्षांनंतरच्‍या मॅच्युरिटीवर म्हणजेच 2045 मध्‍ये तुम्हाला केवळ 15 लाख 14 हजार रुपये व्याज मिळू शकते. याचा अर्थ असा की 7.20 लाखाच्या गुंतवणुकीवर तुम्ही15.14 लाख व्याज मिळवू शकता. गुंतवणुकीची रक्कम आणि व्याजाची रक्कम मिळून एकूण २२ लाख ३४ हजार रुपयाचा फंड तुम्ही जमा करू शकाल.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts