SBI Bank : छोटी-छोटी गुंतवणूक तुम्हाला भविष्यात मोठा निधी गोळा करून देते. सध्या बाजारात असे अनेक गुंतवणूक पर्याय आहेत, जे तुम्हाला अगदी कमी गुंतवणुकीत जास्त परतावा देतात. आज आपण SBI च्या अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. जी सामान्य लोकांसाठी फायद्याची योजना आहे. जर तुम्ही महिना पगारदार असाल तर ही योजना तुमच्यासाठी उत्तम आहे.
आम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वार्षिकी ठेव योजनेबद्दल बोलत आहोत, ज्यामध्ये तुम्ही मासिक हप्ते-EMI मध्ये उत्पन्न मिळवू शकता. SBI च्या ॲन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये एकदा पैसे जमा केल्यावर, ते समान मासिक हप्त्यांमध्ये – EMI मध्ये तुम्हला मिळू शकते. या योजनेत चक्रवाढ व्याजाची गणना तिमाही आधारावर केली जाते. विशेष म्हणजे या कमाईवर दर महिन्याला विशेष सूट देखील आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया ॲन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये, एकरकमी रक्कम एकावेळी जमा करावी लागते. तुम्ही या रकमेवर व्याज आणि मूळ रकमेचा काही भाग दरमहा नियमित उत्पन्न म्हणून घेऊ शकता. या योजनेला मासिक वार्षिकी हप्ता असेही म्हणतात.
ठेवीची मुदत 3 वर्षे, 5 वर्षे, 7 वर्षे किंवा 10 वर्षे आहे. व्याज दर देखील त्याच कालावधीच्या मुदत ठेवींप्रमाणेच आहे. ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर अतिरिक्त व्याजदर लागू होतो. या योजनेत किमान 25,000 रुपये जमा करता येतील. कमाल रकमेवर मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या ठेव रकमेच्या 75 टक्के पर्यंत कर्ज देखील घेऊ शकता.
योजनेची खास वैशिष्ट्ये :-
-एसबीआय वार्षिक ठेव योजनेत, एकरकमी रक्कम एकावेळी जमा करावी लागते.
-यावर मिळणारे व्याज आणि काही मुद्दल रक्कम मासिक हप्त्यांमध्ये घेता येईल.
-SBI वार्षिक ठेव योजनेत, 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांसाठी पैसे जमा केले जातात.
-SBI च्या या योजनेत जमा रकमेवर मर्यादा नाही.
-एसबीआय वार्षिक ठेव योजनेत, तुम्ही तुमची ठेव रक्कम वेळेपूर्वी काढू शकता.
-ठेवीदाराचा मृत्यू झाल्यास कोणत्याही मर्यादेशिवाय मुदतपूर्व पेमेंट करण्याची परवानगी आहे.
-15,00,000 रुपयांपर्यंतच्या ठेवींसाठी मुदतपूर्व पेमेंट करण्याची परवानगी आहे.
-मुदत ठेव योजनेवर लागू होणारा व्याज दर या वार्षिक ठेवीवर देखील लागू आहे.
-ॲन्युइटी जमा केल्याच्या तारखेनंतर महिन्याच्या तारखेला दिली जाते.
-विशेष प्रकरणांमध्ये, वार्षिकी शिल्लकच्या 75 टक्के पर्यंत ओव्हरड्राफ्ट/कर्ज प्रदान केले जाऊ शकते.