आर्थिक

अद्याप पैसे बचतीला सुरवातच नाही केली ? दसऱ्याच्या दिवशी करा ‘हे’ प्लॅनिंग, पुढच्या वर्षांपर्यंत पडेल पैशांचा पाऊस

Dussehra 2023 : तुम्ही अजूनही पैसे बचत करायला सुरवात केली नाहीये का ? तसे असेल तर आजपासूनच बचत सुरू करा. आज दसऱ्याच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, त्या लक्षात ठेवल्यास येत्या पुढील 1 वर्षात तुमच्या जवळ एक मोठा फंड बनेल.

या दसऱ्याला तुम्हाला तुमच्या पैशांशी संबंधित काही चुका सुधाराव्या लागतील. वाईटावर चांगल्याच्या विजय म्हणजे दसरा. हा सण प्रत्येक व्यक्तीला वाईट गोष्टी स्वत:मधून काढून टाकण्याचा संदेश देतो. याच निमित्ताने काही गोष्टी लक्षात ठेवल्यास पुढील वर्षापर्यंत तुमच्याकडे खूप मोठी रक्कम जमा झालेली असेल.

बजेट बनवा व नंतर खर्च करा

खर्च करण्यापूर्वी आपले बजेट तयार करा. अनेकदा लोक बजेट न बनवता पैसे खर्च करू लागतात. अशा वेळी तुमचा बराचसा पैसा निरुपयोगी गोष्टींवर खर्च होतो. आपण नेहमीच आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवले पाहिजे. याशिवाय किती पैसे खर्च करायचे आणि किती पैसे वाचवायचेत हे आधीच ठरवावे.

उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नका

आपल्या उत्पन्नानुसार पैसे खर्च करावेत. तुमच्याकडे जे काही पैसे आहेत, ते तुम्ही वाचवले पाहिजेत. जर तुमचा खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असता. यामुळे तुमचे भविष्य उद्ध्वस्त होऊ शकते.

रिटायरमेंटचे आत्ताच नियोजन करा

जर तुम्ही अद्याप रिटायरमेंटचे प्लॅनिंग केले नसेल तर आजपासूनच त्याची सुरुवात करा. रिटायरमेंट प्लॅनिंग प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचं असतं. म्हातारपणासाठी पैशांची बचत खूप महत्त्वाची आहे. तसे न केल्यास भविष्यात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

कर्ज घेण्याची सवय सोडा

अनेकांना कर्ज घेण्याची सवय असते. लोक कर्जावर कर्ज घेत राहतात. जर तुम्हाला याची सवय असेल तर आजच सोडा. वारंवार कर्ज घेतल्याने तुमची आर्थिक प्रगती होत नाही.

गुंतवणूक करण्यापूर्वी घ्या संपूर्ण माहिती

तुम्हाला आजपासून गुंतवणुकीला सुरुवात करावी लागेल. पण कुठेही पैसे गुंतवू नका. सरकारी योजना किंवा बँक एफडीमध्ये पैसे गुंतवू शकता. याशिवाय तुम्ही दर महिन्याला एसआयपी देखील करू शकता. सुरवातीला तुम्ही तुमचे पैसे अशा ठिकाणी गुंतवावेत जिथे जोखीम नसते किंवा ती खूप कमी असते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office