HDFC Bank Account : HDFC ही देशातील खूप मोठी बँक आहे. दरवर्षी या बँकेची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. इतर बँकांपेक्षा ही बँक आपल्या ग्राहकांना जास्त व्याज देते. तसेच ही बँक मुदत ठेवींवर देखील जास्त व्याज देते.
ग्राहकांच्या हितासाठी बँक अनेक प्लॅन्स घेऊन येत असते. ज्यांचा बँकेच्या ग्राहकांना फायदा होईल. त्यामुळे अनेकांचे या बँकेत खाते असते. जर तुमचेही या बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.
स्टॉक डिलिस्टिंग होणार 13 जुलैपासून प्रभावी
याबाबत एचडीएफसी समूहाचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी माहिती दिली की, विलीनीकरणाला मंजुरी देण्यासाठी 30 जून रोजी बाजार बंद झाल्यानंतर एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीच्या बोर्डांची बैठक होणार आहे. तसेच समूहाचे उपाध्यक्ष आणि सीईओ केकी मिस्त्री यांच्या मतानुसार, HDFC स्टॉक डिलिस्टिंग 13 जुलै 2023 पासून प्रभावी होणार आहे. म्हणजेच 13 जुलै रोजी समूहाच्या हाऊसिंग फायनान्स फर्मचे शेअर्स स्टॉक एक्स्चेंजमधून डिलिस्ट करण्यात येणार आहेत.