HDFC Bank : भारतातील सर्वात मोठी बँक HDFC ने नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वीच आपल्या ग्राहकांना खास भेट दिली आहे. बँकेने जेष्ठ नागरिकांसाठी सुरु केलेली विशेष एफडीची अंतिम मुदत वाढवली आहे. ज्या अंतर्गत बँक ग्राहकांना जास्त व्याजदर ऑफर करत आहे. येथे गुंतवणूक करण्यासाठी आता तुम्हाला आणखी वेळ मिळाला आहे. जर तुम्ही सध्या गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आहे.
एचडीएफसी बँकेने सीनियर सिटीझन केअर एफडीमध्ये गुंतवणुकीची वेळ वाढवली आहे. गुंतवणूकदार 10 जानेवारी 2024 पर्यंत HDFC सिनियर सिटीझन केअर FD मध्ये गुंतवणूक करू शकतात.
HDFC बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्क्यांऐवजी 0.25 टक्के अतिरिक्त व्याज देत आहे. बँक ज्येष्ठ नागरिकांना ०.७५ टक्के अतिरिक्त व्याज देते. हे 5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज देत आहे. हे व्याज ५ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर मिळते. सीनियर सिटीझन केअर एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०४ आहे. HDFC बँक सामान्य FD वर ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 7.75% दरम्यान व्याज देत आहे.
एचडीएफसीचे सामान्य एफडीवरील व्याजदर :-
7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के
15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के
30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.00 टक्के
46 दिवस ते ६० दिवस: सामान्य लोकांसाठी – ४.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के
61 दिवस ते 89 दिवस: सर्वसामान्यांसाठी – ४.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के
90 दिवस ते 6 महिने: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के
6 महिने 1 दिवस ते 9 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.25 टक्के
9 महिने 1 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
1 वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.60 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.10 टक्के
15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.10 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के
18 महिने 1 दिवस ते 21 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के
21 महिने ते 2 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के
2 वर्षे 1 दिवस ते 2 वर्षांपेक्षा कमी 11 महिने: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के
2 वर्षे 11 महिने ते 35 महिने: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के
2 वर्षे 11 महिने 1 दिवस ते 4 वर्षे 7 महिने: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के
4 वर्षे 7 महिने 1 दिवस 5 वर्षांपेक्षा कमी किंवा समान: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.75 टक्के.