HDFC Bank : खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. तुमचेही या बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. बँकेच्या या निर्णयामुळे ग्रहांच्या खिशावर अधिक भार पडणार आहे. बँकेने नुकतेच आपले MCLR दर वाढवले आहेत, यामुळे आता ग्राहकांच्या कर्जाचा ईएमआय वाढू शकतो. बँकेने नवीन दर 8 जानेवारीपासून लागू केले आहेत.
HDFC बँकेच्या वेबसाइटनुसार, बँकेची MCLR श्रेणी 8.80 टक्के ते 9.30 टक्के दरम्यान आहे. ओव्हरनाइट MCLR 10 बेसिस पॉईंटने वाढला आहे, त्यानंतर हा दर 8.70 टक्क्यांवरून 8.80 टक्के झाला आहे.
याशिवाय, बँकेने एका महिन्याचा MCLR 5 bps ने 8.75 टक्क्यांवरून 8.80 टक्के केला आहे. तीन महिन्यांचा MCLR ८.९५ टक्क्यांवरून ९ टक्के झाला आहे. सहा महिन्यांचा MCLR देखील 9.20 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. याशिवाय एका वर्षाचा MCLR 5 bps ने 9.20 टक्क्यांवरून 9.25 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, 3 वर्षांचा MCLR 9.30 टक्के आहे.
MCLR म्हणजे काय?
MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट. हा किमान दर आहे ज्याच्या खाली कोणतीही बँक ग्राहकांना कर्ज देऊ शकत नाही. जितके जास्त MCLR दर वाढतात तितके व्याज देखील वाढते. बँकांना त्यांचा रात्रभर, एक महिना, तीन महिने, सहा महिने, एक वर्ष आणि दोन वर्षांचा MCLR दर पुनरावलोकन आणि प्रकाशित करणे बंधनकारक आहे
अशास्थितीत जर कोणत्याही बँकेने MCLR दर वाढवले तर याचा अर्थ गृहकर्ज, वाहन कर्ज यांसारख्या किरकोळ किमतीशी संबंधित कर्जावरील व्याजदर वाढतो. एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा MCLR वाढतो तेव्हा कर्जाचा व्याजदर लगेच वाढत नाही परंतु कर्जदारांचा EMI फक्त रीसेट तारखेलाच वाढतो.
नवीन वर्षात अनेक बँकांनी दर वाढवले
अलीकडे एसबीआय आणि इंडियन बँकेसह अनेक बँकांनी एमसीएलआर दर वाढवले आहेत. इंडियन बँकेने MCLR दर 0.05 टक्क्यांनी वाढवले आहेत. हे बँक दर 3 जानेवारीपासून लागू आहेत.