आर्थिक

एचडीएफसीकडून पुढील पाच वर्षांसाठी ११ लाखांचे वैयक्तिक कर्ज घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागेल ? किती व्याज द्यावे लागेल ? वाचा….

HDFC Bank Personal Loan Details : एचडीएफसी ही भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणजे अधीकोष आहे. या बँकेचे करोडो ग्राहक आहेत. ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज परवडणाऱ्या व्याजदरात उपलब्ध करून देते. सदर बँक गृह कर्ज, व्यवसाय कर्ज, शैक्षणिक कर्ज, सोने तारण कर्ज तसेच वैयक्तिक कर्ज देखील उपलब्ध करून देत आहे.

मात्र, बँकेकडून इतर कर्जापेक्षा वैयक्तिक कर्जासाठी अधिकचे व्याजदर आकारले जाते. जवळपास सर्वच बँका वैयक्तिक कर्जासाठी इतर कर्जांच्या तुलनेत अधिकचे व्याजदर आकारतात.

दरम्यान जर तुम्ही एचडीएफसी बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेणार असाल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण एचडीएफसी च्या वैयक्तिक कर्जाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

वैयक्तिक कर्जासाठीचे व्याजदर

सध्या स्थितीला एचडीएफसी बँक पगारदार लोकांना 10.75 टक्के या व्याजदरावर वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत आहे. मात्र हे बँकेचे किमान व्याजदर असून या व्याजदराचा फायदा ज्या लोकांचा ‘सिबिल स्कोर’ उत्तम आहे त्यांनाच मिळणार आहे.

किमान 750 ते 800 च्या आसपास सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांनाच या किमान व्याजदरात वैयक्तिक कर्जाचा लाभ दिला जाईल.

११ लाखांचे कर्ज घेतले तर कितीचा हप्ता?

एचडीएफसी कडून जर एखाद्या ग्राहकाला 11 लाख रुपयांचे कर्ज 10.75 टक्के या व्याजदरावर पाच वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर त्याला 23 हजार 780 रुपयाचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

म्हणजेच सदर कर्जदाराला 14 लाख 26 हजार आठशे रुपये भरावे लागणार आहेत. अर्थातच तुम्ही घेतलेल्या 11 लाख रुपयांच्या कर्जासाठी तुम्हाला पाच वर्षांनी तीन लाख 26 हजार आठशे रुपये व्याज द्यावे लागणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts