Highest FD Rates : सध्या बरेचजण बँकाच्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. तसेच काही बँका आपल्या एफडीवर जास्तीत जास्त परतावा देखील ऑफर करत आहेत, म्हणूच गुंतवणूकदार एफडीकडे वळताना दिसत आहेत.
अशातच जर तुम्हीही FD मध्ये पैसे गुंतवणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकते. आजच्या या बातमीत आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल माहिती देणार आहोत ज्या FD वर सर्वाधिक व्याज ऑफर करत आहेत. यामध्ये स्मॉल फायनान्स बँका, सरकारी बँका आणि खाजगी बँकांचाही समावेश आहे.
‘या’ बँका एफडीवर देत आहेत सार्वधिक व्याज
एचडीएफसी बँक
एचडीएफसी बँक सामान्य लोकांना 3 टक्के ते 7.20 टक्के दराने व्याजदर ऑफर करत आहे. तर जेष्ठ नागरिकांना ३.५ टक्के ते ७.७५ टक्के व्याज दिले जात आहेत. HDFC ने 1 ऑक्टोबर 2023 पासून हे नवीन व्याजदर लागू केले आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया
SBI देखील FD गुंतवणूकदारांना खूप चांगले व्याज देत आहे. SBI सामान्य गुंतवणूकदारांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदत ठेवींवर 3 टक्के ते 7.10 टक्के दराने व्याज देत आहे. तर जेष्ठ नागरिकांना 3.5 टक्के ते 7.6 टक्के व्यजदर देत आहे.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
युनिटी स्मॉल फायनान्स बँक सामान्य लोकांना गुंतवणुकीवर ४.५ टक्के ते ९ टक्के दराने व्याज देत आहे. त्याच वेळी, बँक वृद्धांना 4.5 टक्के ते 9.5 टक्के व्याज देत आहे.
आयसीआयसीआय बँक
खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी ICICI बँक गुंतवणूकदारांना 3 टक्के ते 7.1 टक्के व्याजदर देत आहे. त्याचबरोबर जेष्ठ नागरिकांना ३.५० ते ७.६५ टक्के दराने व्याज देत आहे.
डीसीबी बँक
डीसीबी बँक सामान्य लोकांना एफडीवर 3.75 टक्के ते 7.9 टक्के दराने व्याज देत आहे. तर वृद्धांना 4.25 टक्के ते 8.50 टक्के व्याज दिले जात आहे. हे जारी केलेले दर 27 सप्टेंबर 2023 रोजी लागू करण्यात आले आहेत.
सर्वोदय स्मॉल फायनान्स बँक
सर्वोदय स्मॉल फायनान्स बँक सामान्य गुंतवणूकदारांना ४ टक्के ते ८.६ टक्के व्याजदर देत आहे. तर वृद्धांना ४.५ टक्के ते ९.१ टक्के दराने व्याज दिले जात आहे.
त्याच वेळी, बँक 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सामान्य गुंतवणूकदारांना 8.6 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.1 टक्के व्याजदर देत आहे.