आर्थिक

Fixed Deposit : ‘या’ 4 बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर सर्वाधिक व्याज; जाणून किती होईल फायदा?

Fixed Deposit : FDमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे, काही बँकांनी आपल्या FD व्यजदरात वाढ करून आपल्या ग्राहकांना खुश केले आहे. आजही एफडीमधील गुंतवणूक खूप लोकप्रिय आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून रेपो दरात कोणताही बदल झालेला नसतानाही काही बँकांनी आपल्या एफडी व्यजदरात वाढ केली आहे.

या महिन्यात चार बँकांनी मुदत ठेवीवरील व्याज वाढवले ​​आहेत. एफडीच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा चांगला फायदा होईल. अशा परिस्थितीत, जर गुंतवणूकदारांना एफडीमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर ही सर्वोत्तम वेळ आहे. चला जाणून घेऊया कोणत्या बँकांनी एफडी दारात वाढ केली आहे.

Axis Bank FD

खासगी क्षेत्रातील बँक Axis बँकेने त्यांच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. हे नवीन दर 14 ऑगस्टपासून झाले आहेत. ही वाढ 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या ठेवींसाठी करण्यात आली आहे. या वाढीनंतर बँक ग्राहकांना एफडीवर 3.5 टक्के ते 8.05 टक्के पर्यंत व्याज देत आहे. जर तुम्हीही Axis बँकेचे ग्राहक असाल तर एफडी करण्याची ही उत्तम वेळ आहे.

Canara Bank FD

सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँक ज्येष्ठ नागरिकांना FD योजनेवर 4% ते 7.75% पर्यंत व्याज देत आहे. हे नवे दर 12 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. येथे गुंतवणूक करून गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळवू शकतात. जर तुम्हीही सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी उत्तम आहे.

Federal Bank FD

स्वातंत्र्य दिनानिमित्त, फेडरल बँकेने ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली होती आणि वाढीव व्याजदर 15 ऑगस्ट 2023 पासून लागू झाले आहेत. फेडरल बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, 13 महिन्यांच्या कालावधीच्या FD वर नवीन व्याजदर लागू करण्यात आले आहेत. बँक ज्येष्ठ नागरिकांना 8.07 टक्के दराने व्याज देत आहे.

Suryoday Small Finance Bank FD

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने ऑगस्टच्या सुरुवातीला 5 वर्षांच्या मुदतीसह FD वर 85 बेसिस पॉइंट (0.85 टक्के) वाढ केली आहे. स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना FD वर 4.50 टक्के ते 9.10 टक्के व्याजदर देत आहे. हे नवीन दर 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर लागू आहेत.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts