Home Loan Interest Rate : जर तुम्ही देखील सध्या घर घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल, आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज ऑफर करत आहेत.
अलीकडे अनेक बँकांनी गृहकर्जाचे दर सुधारित केले आहेत. सणानिमित्त, 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रक्रिया शुल्कावरही सवलत ऑफर दिली जात आहे. याचा अर्थ, तुमच्याकडे गृहकर्ज सूट ऑफर आणि सौद्यांचा लाभ घेण्यासाठी भरपूर वेळ आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा बँकांच्या गृहकर्जाच्या व्याजदरांबद्दल सांगत आहोत. जिथे तुम्हाला अगदी कमी दारात कर्ज मिळेल. आम्ही 30 ते 75 लाख रुपयांच्या गृहकर्जावर किती व्याजदरात कर्ज मिळेल हे सांगणार आहोत. चला तर मग…
बँक ऑफ बडोदा
-30 लाख – 8.40% ते 10.65%
-30 ते 75 लाख – 8.40% ते 10.65%
-75 लाखांपेक्षा जास्त – 8.40% ते 10.90%
पंजाब नॅशनल बँक
-30 लाख – 8.55% ते 10.25%
-30 ते 75 लाख – 8.50% ते 10.15%
-75 लाखांपेक्षा जास्त 8.50% ते 10.15%
पंजाब आणि सिंध बँक
-30 लाख – 8.50% ते 10.00%
-30 ते 75 लाख – 8.50% ते 10.00%
-75 लाखांपेक्षा जास्त – 8.50% ते 10.00%
स्टेट बँक ऑफ इंडिया
-30 लाख – 8.40% ते 10.15%
-30 ते 75 लाख – 8.40% ते 10.05%
-75 लाखांपेक्षा जास्त 8.40% ते 10.05%
युनियन बँक ऑफ इंडिया
-30 लाख – 8.40% ते 10.80%
-30 ते 75 लाख – 8.40% ते 10.95%
-75 लाखांपेक्षा जास्त – 8.40% ते 10.95%
बँक ऑफ इंडिया
-30 लाख – 8.30% ते 10.75%
-30 ते 75 लाख – 8.30% ते 10.75%
-75 लाखांपेक्षा जास्त – 8.30% ते 10.75%
UCO बँक
-30 लाख – 8.45% ते 10.30%
-30 ते 75 लाख – 8.45% ते 10.30%
-75 लाखांपेक्षा जास्त – 8.45% ते 10.30%
बँक ऑफ महाराष्ट्र
-30 लाख – 8.50% ते 11.15%
-30 ते 75 लाख – 8.50% ते 11.15%
-75 लाखांपेक्षा जास्त – 8.50% ते 11.15%
कॅनरा बँक
-30 लाख – 8.50% ते 11.25%
-30 ते 75 लाख – 8.45% ते 11.25%
-75 लाखांपेक्षा जास्त – 8.40%ते 11.15%
इंडियन ओव्हरसीज बँक
-30 लाख – 8.85% पेक्षा जास्त
-30 ते 75 लाख – 8.85% पेक्षा जास्त
-75 लाखांपेक्षा जास्त – 8.85% पेक्षा जास्त
बँक ऑफ बडोदा ऑफर
बँक ऑफ बडोदा (BOB) ने आपल्या ग्राहकांसाठी ‘BOB के संग फेस्टिवल की उमंग’ मोहीम सुरू केली आहे. बँक ऑफ बडोदाची ही विशेष मोहीम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत चालणार आहे. या मोहिमेअंतर्गत बँकेने गृहकर्ज, पर्सनल लोन, कार लोन आणि एज्युकेशन लोनवर अतिशय आकर्षक व्याजदरावर सणासुदीच्या ऑफर्स सुरू केल्या आहेत.
SBI गृहकर्जाचा व्याजदर
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. सध्या, बँक आपल्या ग्राहकांना 0.17 टक्के प्रक्रिया शुल्कासह वार्षिक 8.40 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. एसबीआयच्या गृहकर्जावर सणासुदीची ऑफर सुरू आहे. यामध्ये ग्राहकांना 65 बेसिस पॉइंट्स म्हणजेच गृहकर्जावर 0.65 टक्के सूट दिली जात आहे. ही सवलत रेग्युलर होम लोन, फ्लेक्सिपे, एनआरआय, सॅलरी क्लास आणि अपॉन होमवर लागू आहे. तुम्ही ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत SBI च्या या सवलतीचा लाभ घेऊ शकता.