आर्थिक

होमलोनचा EMI करता येईल कमी! ‘या’ पाच टिप्स ठरतील फायद्याच्या; होईल EMI चे ओझे कमी

Tips For Reduce Home Loan EMI:- कुठल्याही प्रकारचे कर्ज जर आपण घेतले तर आपल्याला ठराविक कालावधी करिता निश्चित असा त्या कर्जाचा हप्ता म्हणजेच ईएमआय भरणे गरजेचे असते. अगदी याच पद्धतीने होमलोन जरी घेतले तरी आपल्याला त्याचा हप्ता हा प्रत्येक महिन्याला न चुकता भरावा लागतो.

परंतु बऱ्याचदा होमलोन घेतले जाते व त्यानंतर मात्र भरावा लागणारा हा कर्जाचा हप्ता आर्थिक दृष्टिकोनातून खूपच त्रासदायक ठरायला लागतो व होम लोनची रक्कम बरीच मोठी असते व त्याचा कालावधी देखील जास्त असल्याने प्रदीर्घ काळापर्यंत आपल्याला हप्त्याचा बोजा सहन करावा लागतो.

जर या ईएमआय मुळे तुमची आर्थिक घडी विस्कटत असेल तर तुम्ही त्याला कमी देखील करू शकतात. फक्त तुम्हाला त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील व त्या माध्यमातून तुम्ही तुमचा महिन्याचा हप्ता कमी करू शकतात.

या टिप्स वापरा आणि होमलोनचा ईएमआय कमी करा

1- सगळ्यात अगोदर होमलोन घेताना डाऊनपेमेंट जास्त करा- घराची खरेदी करण्यापूर्वी जेव्हा तुम्ही होमलोन घेता तेव्हा तुम्हाला काही रक्कम डाऊनपेमेंट साठी द्यावी लागते. यामध्ये तुम्ही जितके जास्त डाऊन पेमेंट कराल तितका महिन्याचा हप्ता कमी भरावा लागतो.

यामध्ये तुमच्या घराचे एकूण किमतीच्या पंचवीस टक्के डाऊन पेमेंट करणे गरजेचे आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्ही जर 40 लाख रुपयांचे घर खरेदी करत असाल तर दहा लाख रुपयांचे डाऊनपेमेंट करणे गरजेचे आहे.

2- प्री पेमेंट करण्याचा प्रयत्न करा- तुम्हाला एखाद्या वेळेस जर अतिरिक्त एकरकमी पैसे मिळत असतील तर तेव्हा त्यासोबत गृह कर्जाचे प्री पेमेंट करण्यावर भर द्या. अशाप्रकारे जर तुम्ही प्री पेमेंट केले तर तुमची कर्जाची जी काही मूळ रक्कम असते म्हणजे जी मुद्दल असते ती कमी होते व महिन्याचा हप्ता व त्यासोबत कर्जाचा कालावधी देखील कमी होतो.

अशा प्रकारे कर्जाचा कालावधी कमी केल्याने आर्थिक दृष्टिकोनातून येणारा ताण कमी होतो व बँकेला देखील तुम्हाला कमी व्याज द्यावे लागते.

3- होमलोन ट्रान्सफर करणे- तुमचा कर्ज परतफेडीचा रेकॉर्ड जर उत्तम असेल तर तुम्ही कमी व्याजदर देत असलेल्या एखाद्या बँकेकडे तुमचे कर्ज ट्रान्सफर करू शकतात. होमलोन शिल्लक हस्तांतरण हा एक उत्तम असा पर्याय आहे.

परंतु अशाप्रकारे तुमचे कर्ज हस्तांतरित करण्याअगोदर तुम्हाला त्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त खर्चाबद्दलची माहिती घेणे गरजेचे आहे. यामध्ये आवश्यक प्रक्रिया शुल्क आणि फोर क्लोजर फी यासारख्या शुल्काचा समावेश असू शकतो.

4- होमलोन ओव्हरड्राफ्ट सुविधेचा वापर- तुम्ही यामध्ये होमलोन ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊ शकतात. त्यामध्ये तुम्ही तुमच्या ईएमआय व्यतिरिक्त तुमच्या लोन खात्यात जास्तीची रक्कम देखील जमा करू शकतात.

खात्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे अतिरिक्त पैसे जर ठेवले तर तुमची व्याजाची रक्कम कमी होते व कर्जाचा कालावधी कमी होऊन कर्ज लवकर बंद होते.

5- फ्लोटिंग रेटने कर्ज घेण्याला प्राधान्य देणे- कर्ज घेताना तुम्ही फ्लोटिंग इंटरेस्ट रेट चा पर्याय निवडू शकता. या कर्जावरील व्याजदर बाजारातील परिस्थितीनुसार बदलत असतो.

व्याजदर जर कमी झाला तर तुमचा ईएमआय देखील कमी होतो. परंतु व्याजदर जर वाढला तर मात्र ईएमआय वाढण्याचा देखील यामध्ये धोका असतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil