Home Loan News : गेल्या काही वर्षांपासून मालमत्तेची मागणी आणि किंमत झपाट्याने वाढत चालली आहे. विशेष म्हणजे आगामी काळात सुद्धा किंमत वाढतच राहणार आहे. यात निवासी मालमत्तेच्या किमती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. घरांच्या किमतीत सातत्याने मोठी उसळी पाहायला मिळत आहे.
आजच्या या काळात जर तुम्हाला एखाद्या मोक्याच्या ठिकाणी आणि चांगल्या लोकेशनवर घर घ्यायचे असेल तर तुम्हाला सुमारे 70-80 लाख रुपये खर्च करावे लागतील. आता साहजिकच सर्वांकडेच एवढी मोठी रक्कम उपलब्ध राहत नाही.
यामुळे अनेकजण घर खरेदीसाठी बँकेकडे धाव घेतात. बँकेकडून गृह कर्ज घेऊन अनेक जण घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही येत्या काही दिवसात गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे.
कारण की आज आपण सर्वात कमी व्याजदरात गृह कर्ज ऑफर करणाऱ्या बँकांची माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
सर्वात कमी व्याजदरात गृह कर्ज देणाऱ्या बँका
स्टेट बँक ऑफ इंडिया : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 8.50% ते 9.85% या व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे.
बँक ऑफ बडोदा : बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना 8.40% ते 10.90% या इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज ऑफर करत आहे. बँक ऑफ बडोदा ही देखील देशातील एक अग्रगण्य सरकारी बँक आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया : युनियन बँक ऑफ इंडिया ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना 8.35% ते 10.90% या इंटरेस्ट रेटवर गृह कर्ज ऑफर करत आहे.
पंजाब नॅशनल बँक : पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना 8.40% ते 10.15% या इंटरेस्ट रेट वर आपल्या ग्राहकांना गृह कर्ज ऑफर करत आहे.
बँक ऑफ इंडिया : बँक ऑफ इंडिया देखील आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्यां इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज ऑफर करत आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना 8.40% ते 10.85% या इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज ऑफर करत आहे.