Home Loan Update:- प्रत्येकाला स्वतःचे पक्के घर असावे ही इच्छा असते. परंतु जर आपण सध्याच्या महागाईच्या कालावधीचा विचार केला तर यामध्ये घर बांधणीसाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्यांचे दर प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे घर बांधणे खूप खर्चिक असे काम झाले आहे. त्यात स्वतःची जागा नसेल तर जागेचे भाव देखील गगनाला पोचले असल्याने जागा घेऊन स्वतःचे घर उभारणे म्हणजे खूप मोठे दिव्य आहे.
त्यामुळे स्वतःच्या घराची इच्छा पूर्ण करण्यासाठी बरेच व्यक्ती हे गृह कर्जाचा आधार घेतात व त्याकरिता बँकांच्या माध्यमातून कर्ज मिळवून मग घराचे स्वप्न पूर्ण केले जाते. परंतु कर्ज घेताना त्या घेत असलेल्या कर्जाचे व्याजदर किती आहेत हे देखील पाहणे महत्त्वाचे असते. अव्वाच्या सव्वा व्याजदर असेल तर आपल्याला आर्थिक समस्या उद्भवू शकते व आपण कर्जाच्या विळख्यात अडकण्याची दाट शक्यता असते.
त्यामुळे प्रत्येक जण कुठलेही कर्ज घेताना त्याचा व्याजदराचा विचार प्रकर्षाने करतात व तो गृह कर्जाच्या बाबतीत करणे देखील तितकेच फायद्याचे आहे. त्यामुळे अशा कोणत्या बँक आहेत की ते आपल्याला कमीत कमी व्याजदरामध्ये गृहकर्ज उपलब्ध करून देतात याची माहिती असणे गरजेचे आहे व याच दृष्टिकोनातून या लेखात आपण कमीत कमी व्याजदरात गृह कर्ज देणाऱ्या बँकांची माहिती घेणार आहोत.
या बँका देतात कमी व्याजदरात गृहकर्ज
1- युनियन बँक ऑफ इंडिया– तीस लाख रुपयांच्या घरावर वीस वर्षाच्या कालावधीत सर्वात कमी व्याजदर आकारणाऱ्या बँकांमध्ये जर विचार केला तर युनियन बँक ऑफ इंडिया एक महत्त्वाची बँक आहे. ही बँक ग्राहकांना होम लोन अर्थात गृह कर्जावर 8.40 ते 10.80 टक्के व्याजदर आकारात असून प्रोसेसिंग फीज अर्थात प्रक्रिया शुल्काचा विचार केला तर एकूण कर्ज रकमेच्या 0.50% किंवा जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये घेतले जाण्याची शक्यता आहे.
2- बँक ऑफ बडोदा– बँक ऑफ बडोदा ही एक अग्रगण्य बँक असून या बँकेच्या माध्यमातून 30 लाख रुपयांच्या होमलोन वर 8.40% ते 10.60% व्याजदर आकारले जात असून कर्ज रकमेच्या 0.50 टक्क्यांपर्यंत प्रक्रिया शुल्क आकारत आहे.
3- इंडियन बँक– तुम्हाला जर होम लोन घ्यायचे असेल तर तुम्ही इंडियन बँकेचा देखील विचार करू शकतात. गृहकर्जावरचा इंडियन बँकेचा व्याजदर पाहिला तर तो 8.45% ते 10.20% इतका आहे.या बँकेच्या माध्यमातून एकूण कर्ज रकमेच्या 0.25 टक्क्यांपर्यंत प्रोसेसिंग फीज आकारले जाते.
4- आयडीबीआय बँक– ही देखील एक महत्त्वाची बँक असून या बँकेच्या माध्यमातून गृह कर्ज घ्यायला परवडू शकते. आयडीबीआय बँक गृह कर्जावर 8.45 ते 12.25% व्याजदर आकारते. आयडीबीआय बँकेचा एकूण कर्ज रकमेचे प्रक्रिया शुल्क म्हणजेच प्रोसेसिंग फिचा विचार केला तर ती 5000 ते 15 हजार रुपये पर्यंत भरावी लागते.
5- युको बँक– गृह कर्जासाठी ही बँक देखील एक फायद्याची बँक असून तुम्हाला जर वीस वर्षाच्या कालावधी करिता 30 लाख रुपयांचे होम लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला 8.45 ते 12.60% इतका व्याजदर युको बँकेकडून आकारला जातो. तसेच कर्जाच्या रकमेवर प्रक्रिया शुल्क अर्थात प्रोसेसिंग फी 1500 ते 15 हजार रुपये भरावे लागतात.
या पद्धतीने कमीत कमी व्याजदरामध्ये या पाचही बँक होमलोन देतात.