आर्थिक

Post Office : पोस्ट ऑफिस आरडीमध्ये दरमहा 2000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती मिळेल फायदा? जाणून घ्या…

Post Office : जर तुम्ही छोटी बचत करून मोठा निधी गोळा करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट बद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही अगदी 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करू शकता.

जरी तुम्हाला बँकांमध्ये वेगवेगळ्या कार्यकाळाच्या आरडीचा पर्याय दिला जातो, परंतु पोस्ट ऑफिसची आरडी 5 वर्षांसाठी आहे. अशा परिस्थितीत 5 वर्षांसाठी दरमहा ठराविक रक्कम जमा करून चांगली रक्कम जमा होण्यास मदत होते. सध्या पोस्ट ऑफिस आरडीवर 6.7 टक्के व्याज देत आहे. अशा परिस्थितीत, येथे आपण या योजनेत दरमहा 2000, 3000 आणि 5000 जमा केले, तर तुम्हाला सध्याच्या व्याजदरानुसार किती नफा मिळेल हे जाणून घेणार आहोत.

5,000 रुपयाची गुंतवणूक

जर तुम्ही दरमहा 5,000 ची आरडी सुरू केल्यास, तुम्ही 5 वर्षांत एकूण 3,00,000 रुपयाची गुंतवणूक कराल. पोस्ट ऑफिस आरडी कॅल्क्युलेटरनुसार, तुम्हाला 6.7 टक्के दराने 56,830 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे, तुम्हाला परिपक्वतेवर 3,56,830 मिळतील.

3,000 रुपयाची गुंतवणूक

जर तुम्हाला दरमहा 3,000 चा RD सुरू करायचा असेल, तर तुम्ही एका वर्षात 36,000 आणि 5 वर्षात एकूण 1,80,000 ची गुंतवणूक कराल. पोस्ट ऑफिस आरडी कॅल्क्युलेटरनुसार, नवीन व्याजदरांनुसार, तुम्हाला 34,097 रुपये व्याज म्हणून मिळतील आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 2,14,097 रुपये मिळतील.

2,000 रुरुपयाची गुंतवणूक

तुम्ही 5 वर्षांसाठी दरमहा 2,000 ची आरडी सुरू करणार असाल, तर तुम्ही एका वर्षात 24,000 आणि 5 वर्षात 1,20,000 गुंतवाल. अशा स्थितीत तुम्हाला नवीन व्याजदरासह म्हणजेच 6.7 टक्के व्याजासह 22,732 रुपये मिळतील. अशा परिस्थितीत, 5 वर्षांनंतर, तुमची गुंतवणूक केलेली रक्कम आणि व्याजाची रक्कम एकत्रित केली जाईल आणि तुम्हाला एकूण 1,42,732 रुपये मिळतील.

तुमच्या माहिती साठी केंद्र सरकारचे वित्त मंत्रालय दर तीन महिन्यांनी लहान बचत योजनांवरील व्याजाचा आढावा घेते. 1 ऑक्टोबर 2023 रोजी सरकारने पोस्ट ऑफिस आरडीवरील व्याज 6.5 टक्क्यांवरून 6.7 टक्के केले होते. त्यानंतर त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तुम्ही आरडी सुरू करण्याच्या व्याजदरानुसार तुम्हाला 5 वर्षात व्याज मिळते. यादरम्यान आरडीच्या व्याजदरात बदल झाला तरी त्याचा तुमच्या गुंतवणुकीवर परिणाम होणार नाही.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts