SBI Home Loan EMI : आज प्रत्येक व्यक्तीला वाटते स्वतःचे घर असावे, पण आजच्या काळात घर घेणे खूप महागले आहे. अशास्थितीत बँका आपल्याला घर घेण्यासाठी मदत करू शकतात, तुम्ही बँकांकडून गृहकर्ज घेऊन तुमचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. बँकानुसार गृहकर्जाचे दर बदलतात. आज आपण देशातील सर्वात मोठ्या बँकेच्या गृहकर्जाबद्दल जाणून घेणार आहोत.
सध्या देशातील सर्वात मोठी बँक SBI तुमचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करत आहे. ही बँक 30 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज 20 वर्षांसाठी देत आहे. ज्यासाठी 9.15 टक्के व्याज आकारले जात आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला मासिक ईएमआय किती असेल जाणून घेऊया…
SBI वेबसाइटवर मिळालेल्या माहितीनुसार, CIBIL स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असलेल्या ग्राहकांना गृहकर्ज 91.5 टक्के दराने दिले जाते. समजा आपण 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर 9.15 टक्के दराने तुम्हाला महिन्याला EMI 27282 रुपये असेल. एकूण कार्यकाळात तुम्हाला 35 लाख 47 हजार 648 रुपये व्याज भरावे लागणार आहे. ज्यामध्ये एकूण पेमेंट 65,47,648 रुपये असेल.
तुम्ही तुमच्या CIBIL स्कोअर आणि कर्जाची परतफेड करण्याच्या क्षमतेवर आधारित गृहकर्जाच्या व्याजदरांची सौदेबाजी करू शकता. आणि फ्लोटिंग रेटवरील व्याजदर सध्याच्या दरांपेक्षा खूपच कमी असू शकतात.
SBI सारख्या शेड्युल्ड बँकांकडून गृहकर्ज थेट RBI रेपो रेटशी जोडलेले असतात. रेपो रेट म्हणजे व्याजदर. ज्यावर व्यापारी बँका RBI कडून कर्ज घेतात. रेपो दरातील चढ-उताराचा परिणाम वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज आणि गृहकर्जांवर होतो.