7th Pay Commision:- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता तसेच वेतन आयोगाची स्थापना इत्यादी मुद्दे हे खूप महत्त्वाचे असून कारण या मुद्द्यांचा थेट संबंध हा कर्मचाऱ्यांच्या पगारावर होत असतो. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता घर भाडे आणि महागाई भत्त्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
जर आपण यामध्ये महागाई भत्त्याचा विचार केला तर कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये 2023 या वर्षाच्या शेवटी चार टक्क्यांची वाढ करण्यात आलेली होती व या वाढीसह मिळणारा महागाई भत्ता हा 42 टक्क्यांवरून 46 टक्के इतका झाला होता व आता सध्या कर्मचाऱ्यांना 46% इतका महागाई भत्ता मिळत आहे.
परंतु महागाई भत्त्यात परत चार टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता असून मार्च महिन्यामध्ये याला मंजुरी मिळण्याची शक्यता असून याची अंमलबजावणी मात्र एक जानेवारी 2024 पासून करण्यात येईल. त्यामुळे साहजिकच जानेवारी ते मार्च या कालावधीतील महागाई भत्ता थकबाकी म्हणून देण्यात येणार आहे.
यामध्ये येऊ घातलेल्या होळी या सणाच्या अगोदर महागाई भत्ता मध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली जाईल अशी शक्यता आहे. जर असे झाले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे पैसे एकरकमी मिळू शकणार आहेत. म्हणजेच ही तीन महिन्यांची थकबाकी सर्व केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांना मिळणार आहे.
तसेच महागाई भत्त्याची गणना ही नव्या वेतन श्रेणीत वेतन श्रेणीनुसार केली जाणार असून जर आपण लेव्हल एकच्या कर्मचाऱ्यांचा विचार केला तर सध्या त्यांचा ग्रेड पे 1800 रुपये व बेसिक पे अठरा हजार रुपये इतका आहे. तसेच यासोबत प्रवासी भत्ता देखील जोडला जाऊ शकतो.
ग्रेड पेनुसार महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे येणारी तफावत
1- लेवल -1- लेवल एक ग्रेड पे 1800 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे 18 हजार रुपये असून महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे एकूण महागाई भत्त्यात साधारणपणे 774 रुपयांची तफावत म्हणजेच फरक आहे.
2- लेव्हल 1 मध्ये ग्रेड पे 1800 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचे कमाल मूळ वेतन 56 हजार 900 रुपये असून या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्याने एकूण महागाई भत्त्यात 2276 रुपयांचा फरक म्हणजेच तफावत आहे.
3- लेवल 10 मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड पे 5400 असून या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 56 हजार शंभर रुपये आहे व महागाई भत्त्यात वाढ झाल्याने महागाई भत्त्यात 224 रुपयांचा फरक म्हणजेच तफावत आली आहे.
लेव्हल एक ते लेवल 18 पर्यंत ग्रेड पे मध्ये विभागणी
तर आपण सातव्या वेतन आयोगाचा विचार केला तर या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराची म्हणजेच वेतनाची लेवल एक ते लेवल 18 पर्यंत ग्रेड पे मध्ये विभागणी करण्यात आलेली असून यामध्ये ग्रेड पे आणि प्रवास भत्त्याच्या आधारे महागाई भत्त्याची गणना केली जाते
व लेवल एक मध्ये किमान वेतन 18000 तर कमाल वेतन 56 हजार 900 रुपये आहे. तसेच लेव्हल दोन ते 14 पर्यंतच्या ग्रेड पेनुसार पगार बदलत असतो. त्यामध्ये लेवल 15, लेव्हल 17 आणि लेवल 18 मध्ये ग्रेड पे नाही.
या ठिकाणी पगार निश्चित केला जात असतो. यामध्ये लेवल 15 किमान मूळ वेतन एक लाख 82 हजार दोनशे तर कमाल वेतन दोन लाख 24 हजार 100, लेवल 17 मध्ये बेसिक सॅलरी दोन लाख 25 हजार निश्चित करण्यात आलेली असून लेव्हल 18 मध्ये दोन लाख 50 हजार रुपये बेसिक पगार आहे.